Thursday, December 26, 2024
Homeआरोग्यसोशल मीडियावर मोदींच्या राजीनाम्याची केली जातेय मागणी ; सातत्याने केला जातोय "हा"...

सोशल मीडियावर मोदींच्या राजीनाम्याची केली जातेय मागणी ; सातत्याने केला जातोय “हा” ट्रेंड

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी सुरुवाती पासूनच मोदींनी योग्य ती पाऊले उचलली नाहीत अशी टीका जगभरातून होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा देण्याची मागणी सातत्याने सोशल मीडियावर केली जात आहे यासाठी #Resign_PM_Modi हा ट्रेंड सुरू आहे.

देशभरात रोज तीन लाखांच्या पुढे नवीन केस समोर येत आहे. मृतांचा आकडा देखील मोठा आहे. देशातील अनेक शहरांमधील रुग्णालयात ऑक्सिजन नाही, व्हेंटिलेटर नाही तर रेमडीसीविरचा देखील मोठा तुटवडा निर्माण होतो आहे. रोज ऑक्सिजन अभावी शेकडो कोरोना बधितांचा मृत्यू होतो आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरून मोदींनी राजीनामा देण्याची मागणी केली जाते आहे.


एका ट्विटर युजर कर्त्याने म्हटले आहे की, “कोरोना संसर्गाने देश बेहाल झाला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल मध्ये लाखोंच्या सभा घेत प्रचारात व्यस्त होते” असे म्हणत मोदींनी राजीनामा करण्याचा हॅश टॅग वापरला आहे.


भारत एक असा देश आहे जेथे रूग्णालये बांधण्यापेक्षा मंदिरे, मशिदी आणि पुतळे तयार करणे अधिक पसंत करतात असे एकाने म्हंटले आहे.

भाजपाने तेलंगणामध्ये होत असलेल्या महानगरपालिका निवडणूकीसाठी मोठी रॅली काढली. तुम्हाला अशा मुर्खांनी तुमचे राज्य चालवावे असे वाटते? कोण स्वत: च्या जीवनाची कदर करत नाही, पण ते तुमच्या आयुष्याची कदर करतात? याबाबत पुन्हा विचार करा आणि मग मतदान करा. #Resign_PM_modi असे एका युजर कर्त्याने म्हंटले आहे. 


गेल्या आठवड्यात देखील अशाच पद्धतीने #Resign_PM_Modi  हा ट्रेंड चालवण्यात आला होता. 

अधिक वाचा 

मोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा 

संबंधित लेख

लोकप्रिय