Friday, May 3, 2024
HomeNewsराज्यस्तरीय युवक महोत्सव स्पर्धेत एस. एम.जोशी महाविद्यालयातील ऋतुजा भाडळे प्रथम

राज्यस्तरीय युवक महोत्सव स्पर्धेत एस. एम.जोशी महाविद्यालयातील ऋतुजा भाडळे प्रथम

हडपसर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघात इंद्रधनुष्य 2022 राज्यस्तरीय युवक महोत्सव स्पर्धेसाठी एस. एम. जोशी महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांची निवड झाली होती. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे राज्यस्तरीय स्पर्धेचे 5 नोव्हेंबर 2022 ते 9 नोव्हेंबर 2022 या दरम्यान आयोजन करण्यात आले होते.

इंद्रधनुष्य 2022 या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील एकूण 22 विद्यापीठांनी सहभाग घेतला होता. इंद्रधनुष्य 2022 राज्यस्तरीय युवक महोत्सव स्पर्धेमध्ये एस. एम. जोशी महाविद्यालयातील ऋतुजा तानाजी भाडळे (SYBA) या विद्यार्थिनीने एकांकिका (One act play) स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.

यावेळी सर्वात जास्त पारितोषिके मिळवून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने द्वितीय क्रमांक मिळविला. इंद्रधनुष्य 2022 राज्यस्तरीय युवक महोत्सव स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले. त्यामुळे विद्यार्थी हे यश मिळवू शकले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामध्ये सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. शिल्पा शितोळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. अतुल चौरे, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य डॉ. किशोर काकडे, डॉ. नम्रता मेस्त्री-कदम, डॉ. विश्वास देशमुख यांचा मोलाचा वाटा आहे.

कु. ऋतुजा भाडळे या विद्यार्थिनीने मिळविलेल्या यशाबद्दल प्राचार्यांनी तिचे अभिनंदन करीत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या कु. देवश्री भोसेकर, कु. शिवानी शेंडकर, महावीर रणदिवे या विद्यार्थ्यांचेही महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Lic
जाहिरात 1
LIC
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय