Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

SSC HSC Results : दहावी बारावीचा निकाल “या” दिवशी लागणार

SSC HSC Results : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल कधी असा प्रश्न सध्या वारंवार विचारला जातोय. राज्यातील दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्यानुसार २५ मेपर्यंत बारावीचा तर दहावीचा निकाल (SSC HSC Results) ६ जूनपूर्वी जाहीर होईल, अशी समोर येत आहे.

---Advertisement---

यंदाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला १७ लाख तर इयत्ता बारावीसाठी १२ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. आता इयत्ता बारावीच्या ९९ टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत. तर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या ८५ टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत. बोर्डाकडून दररोज उत्तरपत्रिका तपासणीचा आढावा घेतला जात आहे. अशात दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा (SSC HSC Results) निकाल कधी लागणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी २५ मेपर्यंत बारावीचा तर दहावीचा निकाल ६ जूनपूर्वी जाहीर होईल, अशी शक्यता व्यक्त केली आहे. तसेच, जे विद्यार्थी परीक्षा अनुत्तीर्ण झाले आहेत, त्यांची पुरवणी परीक्षा जुलैमध्ये होणार आहे.

---Advertisement---

प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण सध्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर यापूर्वीच नोंदवून ठेवले त्यामुळे आता उत्तरपत्रिका तपासून जशा जशा पूर्ण होतील तसे गुणपत्रिका तयार होत आहेत. त्यामुळे दहावी, बारावीचा निकाल मे आणि जून महिन्यात लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahasscboard.in आणि mahresult.nic.in वर निकाल पाहता येणार आहे. येथे क्लिक केल्यावर तुम्हाला परीक्षा क्रमांक टाकावा लागेल.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवत आत्महत्या

स्वतःसाठी खोके घेऊन गप्प बसणाऱ्यांना घरी बसवा – खासदार प्रियंका चतुर्वेदी

ब्रेकिंग: अभिनेता साहिल खान पोलिसांच्या ताब्यात, वाचा काय आहे प्रकरण !

ब्रेकिंग : शरद पवारांना मोठा धक्का ; उमेदवारावरच गुन्हा दाखल, अटकेची टांगती तलवार

मोठी बातमी : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम लोकसभेच्या मैदानात, ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर

मोठी बातमी : भांडूपमध्ये पैशाने भरलेली गाडी पोलिसांच्या हाती, राज्यभरात खळबळ

ब्रेकिंग : राज्यात आणखी एका बँकेला ९ कोटींचा गंडा, भाजप पदाधिकाऱ्यांना अटक

मोठी बातमी : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अभिनेता बेपत्ता

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles