जुन्नर : जुन्नर शहरात नुकतीच शिवाई देवीची यात्रा संपन्न झाली, या यात्रेनंतर शहरात झालेली अस्वच्छता स्वच्छ करण्यासाठी श्री शिवछत्रपती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जुन्नर शहरात शनिवारी विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करत शहरात साफ सफाई केली.
या स्वच्छता अभियान प्रसंगी जुन्नर नगरपालिकेचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत जुन्नर नगरपालिकेस दोन वेळा स्वच्छतेचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे, यामध्ये जुन्नरवासी यांचे तसेच श्री शिवछत्रपती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे मोठे योगदान आहे असे अभिमानाने सांगितले. त्याचबरोबर स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन स्वतःची तसेच संपूर्ण परिसराची स्वच्छता किती महत्वाची आहे याबद्दल देखील माहिती सांगितले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 13 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ! महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 195 जागांसाठी भरती
या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दिपेन्द्र उजगरे तसेच अध्यक्ष प्रतिनिधी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. ही स्वच्छता मोहिम राबवण्यासाठी प्रा. डॉ.राजाराम थोरवे, प्रा. महेंद्र राजपूत, प्रा.मयूर चव्हाण तसेच कुमार सूर्यवंशी यांचे विशेष सहकार्य लाभले. या उपक्रमामुळे समाजासमोर स्वच्छतेचा एक नवा आदर्श तरुण पिढी साठी उभा राहिला आहे.