Home राष्ट्रीय Space mission : इस्रोच्या टेक्नोलॉजीला मोठं यश, भारत आता अवकाशात पाठवू शकतो...

Space mission : इस्रोच्या टेक्नोलॉजीला मोठं यश, भारत आता अवकाशात पाठवू शकतो माणूस!!

Space mission

बेंगळुरू / वर्षा चव्हाण – भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो बऱ्याच काळापासून अवकाशात भारताकडून अवकाशवीर पाठवण्यासाठी काम करत असून अलीकडेच सरकारने यासाठी मिशन 2040 ची तयारी केली आहे. मिशन गगनयानच्या माध्यमातून भारत अवकाशात मानव पाठवण्यासाठी काम करेल. . (Space mission)

गगनयान प्रकल्प हा मानव अंतराळ उड्डाण क्षमता प्रदर्शित करण्यासाठी तीन सदस्यांची एक क्रू 400 किमी कक्षेत पाठवून तीन दिवसीय मिशन आणि त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर भारतीय समुद्रात परत आणण्याचा उद्देश आहे

इस्रोने CE20 Cryogenic Engine साठी आवश्यक एक कठीण सी-लेवल टेस्ट पूर्ण केली आहे. त्यानंतर इस्रो मानवाला अवकाशात पाठवण्याच्या मिशनच्या अजून जवळ आला आहे. इस्रोने 29 नोव्हेंबरला तामिळनाडूच्या महेंद्रगिरी येथील इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्समध्ये ही टेस्ट केली.

मानवी मिशनसाठी क्रायोजेनिक इंजिन आवश्यक आहे. CE20 क्रायोजेनिक इंजिनचा विकास स्वत: इस्रोने केला आहे. लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटरने हे इंजिन डेवलप केलय. हे इंजिन 19 टनाच थ्रस्ट लेवल ऑपरेट करु शकते. अलीकडेच या इंजिनला अपडेट करुन 20 टन कॅपेसिटीच बनवण्यात आलं आहे. गगनयान मिशनमध्ये हे इंजिन वापरण्यात येईल. आ क्रायोजेनिक इंजिनशिवाय मानवाला अवकाशात पाठवणं शक्य नाही.

युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) आणि भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (ISRO) यांनी भारताच्या गगनयान मोहिमांसाठी ग्राउंड ट्रॅकिंग सपोर्टसाठी एक तांत्रिक अंमलबजावणी योजना (TIP) कागदावर सही केली आहे.(Space mission)

या करारामुळे ESA गगनयान मोहिमांसाठी ग्राउंड स्टेशन सपोर्ट प्रदान करेल, ज्यामुळे ऑर्बिटल मॉड्यूलसह सतत डेटा फ्लो आणि संवाद सुनिश्चित होईल, ज्यामुळे निरीक्षण आणि कक्षीय ऑपरेशन्स सुलभ होतील.

ISRO ने सांगितले की ESA सह त्याचे दीर्घकालीन सहकार्य आहे. गेल्या काही वर्षांत विविध अंतरिक्ष मिशनांमध्ये दोन्ही संस्थांनी एकमेकांना यशस्वीरित्या मदत केली आहे आणि भविष्यात देखील सहकार्य करण्याची तयारी आहे. TIP कागदावर सही करणे हे ISRO आणि ESA यांच्यातील सहकार्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

ही TIP 4 डिसेंबर रोजी सतीश धवन अंतरिक्ष केंद्र (SDSC) येथे ISRO कडून डॉ. अनिल कुमार ए. के. (निर्देशक, ISTRAC) आणि ESA कडून डॉ. डाईटमार पिल्ज (टेक्नोलॉजी, इंजिनिअरिंग आणि गुणवत्ता निदेशक, ESTEC, नेदरलँड्स) यांच्याद्वारे सही करण्यात आली.

गगनयान कार्यक्रमांतर्गत ISRO तीन अनक्रूड मिशन्स आणि एक क्रूड मिशन आयोजित करणार आहे. पहिले अनक्रूड मिशन 2024-25 मध्ये आणि पहिले क्रूड मिशन 2025-27 मध्ये होण्याची योजना आहे.

Exit mobile version