Wednesday, September 18, 2024
HomeNewsमोठी बातमी : ड्रग्ज प्रकरणी "या" प्रसिध्द बॉलीवूड अभिनेत्याच्या मुलाला अटक

मोठी बातमी : ड्रग्ज प्रकरणी “या” प्रसिध्द बॉलीवूड अभिनेत्याच्या मुलाला अटक

मुंबई : बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर याला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली आहे. बंगळुरूच्या रेव्ह पार्टीत सिद्धांत कपूरला अटक करण्यात आली. 

एएनआय ने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री बंगळुरू येथील एका हॉटेलमधील रेव्ह पार्टीत बंगळुरू पोलिसांनी छापा टाकला. या पार्टीत अमली पदार्थांचे सेवन केलेल्या ६ जणांपैकी बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूरचा मुलगा व अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर याचाही समावेश आहे. सिद्धांत कपूरला ड्रग्ज घेताना बंगळुरू पोलिसांनी अटक केली.

राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

दरम्यान, 2020 मध्ये, श्रद्धा कपूरला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग तपासात तिची जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होते. एनसीबीच्या तपास पथकाने राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरण आणि बॉलीवूड-ड्रग्सच्या संबंधासंदर्भात तिचे जबाब नोंदवला होता.

कामगार आणि रोजगार मंत्रालय येथे 130 रिक्त जागांसाठी भरती, 50000 रुपये पगाराची नोकरीची सुवर्णसंधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत माळी, उद्यान अधिकारी पदांच्या रिक्त जागांसाठी भरती, 19 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये 196 विविध जागांसाठी भरती, 19 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख

लोकप्रिय