Thursday, October 10, 2024
Homeआंतरराष्ट्रीयभगवान बुद्ध पौर्णिमेनिमित्त भारतातील अस्थिकलश मंगोलियाच्या दिशेने रवाना !

भगवान बुद्ध पौर्णिमेनिमित्त भारतातील अस्थिकलश मंगोलियाच्या दिशेने रवाना !

पुणे : मंगोलियाच्या नागरिकांसाठी एक विशेष मैत्रीभाव म्हणून, येत्या 14 जून, 2022 रोजी असणाऱ्या मंगोलियन बुद्धपौर्णिमेच्या उत्सवकाळात 11 दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात ठेवण्यासाठी, भगवान बुद्ध यांचे चार पवित्र अवशेष, भारतातून मंगोलिया इथे नेले जाणार आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांच्या नेतृत्वाखालील 25 सदस्यीय प्रतिनिधीमंडळ हे अवशेष घेऊन मंगोलिया दौऱ्यावर जाणार आहे. तिथल्या गंदान बुद्धविहाराच्या परिसरात असलेल्या बातसागन मंदिरांत हे अवशेष ठेवले जातील. बिहारमधील ‘कपिलवस्तू’ ह्या प्राचीन शहरात, 1898 साली पहिल्यांदा आढळलेले भगवान बुद्धांचे हे अवशेष कपिलवस्तू अवशेष म्हणून ओळखले जात असून, ते सध्या राष्ट्रीय वस्तू संग्रहालयात ठेवले आहेत.

यासंदर्भात आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलतांना किरेन रिजिजू म्हणाले, की भारत- मंगोलिया यांच्यातील संबंधाचा हा नवा ऐतिहासिक टप्पा आहे. यामुळे, दोन्ही देशातील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील २५ हजार शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार – शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 साली, मंगोलियाला भेट दिली होती, याचे स्मरण करत किरेन रिजिजू म्हणाले की, नरेंद्र मोदी हे , मंगोलियाचा दौरा करणारे पहिलेच भारतीय पंतप्रधान होते. आता भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष मंगोलियाला नेणे हा, दोन्ही देशांमधील प्राचीन सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध पुरुज्जीवित करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीनुसार आखलेला कार्यक्रम आहे, असेही ते म्हणाले.

कामगार आणि रोजगार मंत्रालय येथे 130 रिक्त जागांसाठी भरती, 50000 रुपये पगाराची नोकरीची सुवर्णसंधी

सोयाबीन बियाणे घेताना फसवणूक होण्याची शक्यता, अशी घ्या काळजी !

संबंधित लेख

लोकप्रिय