Thursday, December 5, 2024
Homeराज्यशिवाजी विद्यापीठाचा अजब कारभार; परिक्षा रद्द झाल्या असतानाही विद्यार्थ्यांना परिक्षा फी भरण्याचे...

शिवाजी विद्यापीठाचा अजब कारभार; परिक्षा रद्द झाल्या असतानाही विद्यार्थ्यांना परिक्षा फी भरण्याचे आदेश.

(प्रतिनिधी) :- शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या ३ व ५ वर्षीय अभियंत्रिकी, औषध निर्माण, विधी, आर्किटेक्चर, बी.टेक आणि एम.बीए. या शाखेतील प्रथम वर्षाच्या प्रथम सत्राचा निकाल लाॅकडाऊनच्या काळात घोषित करण्यात आला होता. तद्नंतर कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावामुळे द्वितीय सत्राची लेखी परिक्षा शासकिय आदेशानुसार रद्दबातल करण्यात आलेली आहे.

          तरीही शिवाजी विद्यापीठाने ३ व ५ वर्षीय विधी शाखेतील प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राची परीक्षा फी भरण्याचे विद्यार्थ्यांना परिपत्रक काढले आहे. लॉकडाऊनची परिस्थिती आणि परिक्षा रद्द झाली असताना परिक्षा शुल्क कशाची असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहे.

          परिपत्रकामध्ये म्हटले आहे, परिक्षा शुल्क ८ जून ते १५ जून २०२० पर्यंत भरले गेले नाहीतर त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही असे म्हटले आहे.

            प्रतिक्रिया:- 

परिक्षाचं नाही तर परिक्षा फी कोणत्या गोष्टीची घेतयं हे विद्यापिठाने स्पष्ट करावं. एक विद्यार्थी म्हणून विद्यापीठांने घेतलेला हा तुघलकी निर्णय नक्कीच विद्यार्थ्यांच्यावर अन्याय करणारा आहे. विद्यापिठाने आपला हा निर्णय तात्काळ मागे घेऊन विद्यार्थ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन पुढच्या सत्राची सुध्दा फी माफ करावी. 

तुषार सोनुले –

विद्यार्थी, लॉ कॉलेज, कोल्हापूर

एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे साहेबांनी सर्व विद्यापीठांमधील प्रथम, द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची परिक्षा रद्द केल्याची घोषणा केली आहे. असे असताना देखील विद्यापीठाने परिक्षा अर्ज आणि परिक्षा फी भरण्यासाठी परिपत्रक काढले आहे. ही विद्यार्थ्यांवर लादलेली अन्यायकारक पध्दत आहे. असा निर्णय घेत असताना विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार केला पाहिजे. त्यामुळे विद्यापीठाने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा.

 तुळशिराम गळवे –

विद्यार्थी सोटी विधी कॉलेज, सांगली

आधीच विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती कमजोर आहे. त्यात भरीस भर शिष्यवृत्ती प्रक्रिया रेंगाळली आहे. त्यात शिवाजी विद्यापीठ न झालेल्या परीक्षेची फी घेऊ पाहत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याशी खेळणाऱ्या विद्यापीठाचा एसएफआय निषेध करते. विद्यापीठाने परिक्षा शुल्क तात्काळ रद्द करण्याची मागणी एसएफआय करत आहे.

रत्नदिप सरोदे –

अध्यक्ष, एसएफआय, कोल्हापूर

संबंधित लेख

लोकप्रिय