Monday, July 8, 2024
HomeNewsशास्तीकर:सरकारचा 'जीआर' नाही,फक्त घोषणा-धनाजी येळकर-पाटील

शास्तीकर:सरकारचा ‘जीआर’ नाही,फक्त घोषणा-धनाजी येळकर-पाटील

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: हिवाळी अधिवेशनात विधानसभेमध्ये लक्षवेधी वर शास्तिकराबाबत फक्त चर्चा झाली आहे.

शिंदे फडणवीस सरकारने(GR)कोणतेही परिपत्रक काढलेले नाही.महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पिंपरी चिंचवडकरांना दिलेले हे गाजर आहे.२०१४ मध्ये पालिकेच्या चाव्या आमच्या हाती द्या १०० दिवसात प्राधिकरणातील अनधिकृत बांधकामे आणि शास्तिकराचा प्रश्न निकाली काढू म्हणणाऱ्या फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड करांच्या तोंडाला पाणे पुसली.१० वर्षात सत्तेत असून निर्णय घेतला नाही यातच त्यांचा खोटेपणा उघड झाला. निवडणुकी पूर्वी ठोस निर्णय घेतला तर ठीक अन्यथा पिंपरी चिंचवडची जनता निवडणुकीत भाजपला जागा दाखवेल.अशी प्रतिक्रिया घर बचाव चळवळ,पिंपरी चिंचवडचे नेते धनाजी येळकर पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय