Thursday, December 5, 2024
Homeराष्ट्रीयSFI - DYFI ने वांशिक हल्ला व जात्यांध मानसिकतेच्या विरोधात केले देशभरात...

SFI – DYFI ने वांशिक हल्ला व जात्यांध मानसिकतेच्या विरोधात केले देशभरात आंदोलन.

प्रतिनिधी :- अमेरिकेत झालेल्या वांशिक हल्ल्याच्या निषेधार्थ जगभरात लोक रस्त्यावर उतरत आहेत. गुलामांचा व्यापार होणाऱ्या काळापासून अमेरिकेत होत असलेल्या वंशद्वेषाची जॉर्ज फ्लॉईड यांची हत्या आणि भारतामध्ये लोकांना; प्रामुख्याने कामगार वर्गास जात आणि धर्माच्या नावाने अशी अमानवी, उपेक्षित वागणूक सहन करावी लागते. या विरोध स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाने काल २२ जून रोजी देशभरात आंदोलन केले.

सध्याच्या विद्यार्थी आणि दलित तरुणांच्या हत्या हेच दर्शवतात की ही जात्यांध मानसिकता आणि विभाजनकारी राजकारण यांची मूळे घट्ट होत आहेत. तसेच देशात आणि राज्यात ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू करून सरकार आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहाच्या बाहेर फेकत आहे. हा शैक्षणिक भेदभाव आम्ही कदापी होऊ देणार नाही, असे एसएफआय महाराष्ट्र राज्य कमिटीने म्हटले आहे.

 SFI-DYFI च्या वतीने २२ जून रोजी देशभरात निषेध दिन पाळण्यात आला. वंशभेद, धर्म व जातीभेद तसेच शैक्षणिक भेदभावाच्या विरोधात एकत्र येत #TakeTheKnee ह्या मोहिमेत देशाच्या वेगवेगळ्या भागातील विद्यार्थी व तरुण सहभागी झाले होते.

संबंधित लेख

लोकप्रिय