Friday, December 27, 2024
Homeग्रामीणमांजरी महाविद्यालयातील सन्मती कुरकुटेची अभियांत्रिकी सेवा परीक्षेत निवड

मांजरी महाविद्यालयातील सन्मती कुरकुटेची अभियांत्रिकी सेवा परीक्षेत निवड

मांजरी बु. (पुणे) : नुकत्याच झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यांत्रिक अभियांत्रिकी विभागात सन्मती शरदराव कुरकुटे याने देशात द्वितीय क्रमांक संपादन केलेला आहे, अशी माहिती पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रितेश पाटील यांनी दिली.

परभणी हे सन्मतीचे मुळगाव असून त्याचे कुटुंब पुणे शहरामध्ये वास्तव्यास आहे. त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण बाल विद्या मंदिर, परभणी याठिकाणी झाले. दहावीनंतर पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून त्याने विज्ञान शाखेतून बारावीचे  शिक्षण पुर्ण केलेले आहे. बारावीनंतर त्याने हडपसर येथील नामांकित पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिक अभियांत्रिकी विद्याशाखेतून विशेष प्रविण्यासह पदवी संपादन केलेली आहे. त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली आणि या परीक्षेत द्वितीय क्रमांक संपादन केला.

सन्मतीने मिळविलेल्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड.संदीप कदम, खजिनदार अॅड.मोहनराव देशमुख, उपसचिव लक्ष्मण पवार, सहसचिव (प्रशासन) आत्माराम जाधव, प्राचार्य डॉ.रितेश पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले.

संबंधित लेख

लोकप्रिय