Thursday, December 26, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडचिंचवड येथील ऋतुजा पारखीची अमेरिकेच्या विद्यापीठात निवड

चिंचवड येथील ऋतुजा पारखीची अमेरिकेच्या विद्यापीठात निवड

पिंपरी चिंचवड : सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेची चिंचवडगाव रस्टन कॉलनीतील विद्यार्थिनी ऋतुजा विनायक पारखी हिची जगप्रसिद्ध मिशिगन विद्यापीठ डिअरबॉन (University of Michigan Dearborn- USA) येथे पदव्युत्तर (POST GRADUATE) अभियांत्रिकी उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे.

विशेष प्राविण्य मिळालेली ही विद्यार्थिनी औद्योगिक अभियांत्रिकी (Industrial engineering) MS साठी दोन वर्षांच्या प्रशिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाली आहे.

तिचे वडील विनायक पारखी ISO लेखापरीक्षक आहेत. आई वैशाली पारखी व्यवसायाने कार्पोरेट ट्रेनर आणि HR CONSALTANT आहे, विद्यार्थी युवक चळवळीत (SFI/DYFI) कार्य केलेले आणि व्यवसायाने ISO लेखापरीक्षक असलेले तिचे वडील विनायक पारखी आणि आई वैशाली पारखी यांनी सांगितले की, आम्ही आमच्या कमाईतील सर्वात जास्त पुंजी मुलीच्या शिक्षणासाठी खर्च केली आहे. मुलींना उच्च शिक्षण देणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

संबंधित लेख

लोकप्रिय