Sunday, December 8, 2024
Homeग्रामीणआंबेगाव : जागतिक आदिवासी दिनानिमित्त तळेघर येथे दमा उपचार शिबिर

आंबेगाव : जागतिक आदिवासी दिनानिमित्त तळेघर येथे दमा उपचार शिबिर

सुमारे ८५ रुग्णांना मिळाले उपचार तर ५० रुग्णांना दम्याचा पंपाचे मोफत वितरण….

आंबेगाव : डॉ.शेखर बेंद्रे आरोग्य केंद्र, महाळुंगे तर्फे आंबेगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र तळेघर यांच्या स्थानिक  संयोजनातून जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने मोफत दमा उपचार शिबिर तळेघर येथे आयोजित करण्यात आले होते.

या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी, पुणे येथील डॉ.रघुनाथ आंचल, तळेघर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीश उभे, पंचायत समिती, आंबेगावचे माजी उपसभापती सलीम तांबोळी, तळेघर गावचे सरपंच चंद्रकांत उगले, उपसरपंच, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते दत्ता मावळे, अंकुश केंगले तसेच किसान सभेचे जिल्हा सचिव डॉ.अमोल वाघमारे इ.उपस्थित होते, हा कार्यक्रम ८ ऑगस्ट रोजी तळेघर प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडला.

यावेळी शिबीराचे उदघाटन आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आले. या शिबिरामध्ये दमा रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषध उपचार करण्यात आले.

पुणे येथील दमा उपचार तज्ञ डॉ. रघुपती अंचल यांनी या रुग्णांवर तपासणी करून त्यांना दम्याच्या आजाराला कसा प्रतिबंध करायचा याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.भूषण सोनवणे व डॉ.रेंचल श्रीसुंदर यांनी ही दम्याच्या विविध तपासणी करण्यासाठी सहकार्य केले.

यावेळी तळेघर परिसरातील सुमारे दहा गावांमधून एकूण ८० रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषध उपचार करण्यात आले. त्यावेळी एकूण ५० लोकांना दम्याच्या उपचारासाठी मोफत दम्याचे पंप वितरित करण्यात आले. या शिबीराचे स्थानिक संयोजन आंबेगाव तालुका समितीच्या वतीने करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी किसान सभेचे कृष्णा वडेकर, अशोक पेकारी, अशोक जोशी, दत्ता गिरंगे, अनिल सुपे, रामदास लोहकरे, नंदा मोरमारे, लक्ष्मी अढारी यांनी या उपक्रमाचे यशस्वी आयोजनात महत्वपूर्ण भूमिका बजावली.

संबंधित लेख

लोकप्रिय