मुंबई : एसटी महामंडळाच्या ताफ्यात येत्या दोन महिन्यात इबी कॅश या नव्या कंपनीची ३८ हजार ॲन्ड्रॉइड बेस इलेक्ट्रिक तिकीट इशू मशीन दाखल होणार आहेत. त्यानंतर एसटीत खऱ्या अर्थाने १०० टक्के कॅशलेस सुविधा उपलब्ध होईल.सध्या एसटीत केवळ तीन टक्के व्यवहार कॅशलेस होतात.
एसटी महामंडळाच्या बस मध्ये याआधी ट्रायमॅक्स कंपनीच्या तिकीटच्या मशीन होत्या. मात्र संपूर्ण कालखंडात त्यामध्ये तांत्रिक बिघाड होण्याचे प्रमाण हे सर्वाधिक होते. आधुनिकतेच्या या काळामध्ये चहाच्या टपरी पासून ते पंचतारांकित हॉटेल पर्यंत सर्वत्र ऑनलाईन डिजिटल पेमेंट प्रणाली सेवा अस्तित्वात आहे.
असे एकीकडे चित्र असताना एसटी बस मध्ये कॅशलेस तिकीट प्रणाली यावी अशी मागणी प्रवाशांनी बऱ्याच काळापासून केली होती. या मागणीवर कृती होताना दिसत आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरात कॅशलेस सुविधा उपलब्ध होईल. येत्या दोन महिन्यात या कंपनीतर्फे महामंडळाला ३४ हजार नवीन मशिन पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहकांनाही मोठा दिलासा मिळेल.
हे ही वाचा :
अकोल्यात 2 गटात हिंसक हाणामारी, कलम 144 लागू
ब्रेकिंग : भाजप खासदार बृजभूषण सिंह यांची कुस्ती महासंघ अध्यक्ष पदावरून हकालपट्टी !
कर्नाटकच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा दणदणीत विजय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ
Karnataka Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले काँग्रेसचे अभिनंदन
“संविधानाची पायमल्ली संवैधानिक मार्गाने होते आहे” – संजय आवटे