Saturday, December 21, 2024
Homeग्रामीणएस. एम. जोशी कॉलेजमध्ये विज्ञान दिनाचे आयोजन

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये विज्ञान दिनाचे आयोजन

हडपसर : पर्यावरणाचे संवर्धन केले पाहिजे. पाण्याचा वापर आवश्यक तेवढाच करा. प्रदूषणमुक्त विज्ञाननिष्ठ समाज निर्माण करण्यासाठी विज्ञानाच्या प्राध्यापकांनी प्रयत्न करावेत. वैज्ञानिक दृष्टिकोन आपण आचरणात आणावा. अंधश्रद्धेला आपल्या जीवनात स्थान देऊ नये. विज्ञानाच्या क्षेत्रात शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाचे आपण कष्ट समजून घेतले पाहिजेत. काळानुरूप बदलणार्‍या संशोधन पद्धती आपण समजून घेतल्या तरच भविष्यातील संशोधनाची वाटचाल सुकर होईल, असे विचार प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी मांडले. ते एस. एम. जोशी कॉलेजमध्ये विज्ञान दिन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 

स्टुडेंट टीचर असोसिएशन्स सेल व सायन्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एस. एम. जोशी कॉलेजमध्ये विज्ञान दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी केमिस्ट्री विभागाचे प्रमुख डॉ. गजानन वाघ होते. संशोधन पद्धती व त्यासाठी आवश्यक असणारे गुण याविषयी त्यांनी विचार व्यक्त केले. 

विज्ञान दिनाच्या निमित्ताने पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन बॉटनी विभागाने केले होते. डॉ.एस.पी खुंठे, डॉ. ऋषिकेश खोडदे यांनी त्याचे संयोजन  केले. ग्रंथालय विभागाने कोशवाड्मय ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्याचे संयोजन ग्रंथपाल प्रा. शोभा कोरडे आणि त्यांच्या विभागाने केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत स्टुडेंट टीचर सेलच्या प्रमुख डॉ. रंजना जाधव यांनी केले. पाहुण्यांचा परिचय परिचय डॉ. अशोक पांढरबळे यांनी केला. आभार डॉ. शकुंतला सावंत यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. अमोल पवार यांनी केले.

संबंधित लेख

लोकप्रिय