Monday, February 17, 2025

चार स्वछता कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू

पुणे : लोणी काळभोर येथील कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील प्यासा हॉटेलच्या पाठीमागे  जय मल्हार कृपा सोसायटीच्या शौचालयाची टाकी साफ करताना चार मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला आहे.

सफाईचे काम करताना तोल जाऊन एका पाठोपाठ एक असे दोन कामगार टाकीत पडले, त्यांना वाचवताना उर्वरित दोन कर्मचारीही टाकीत पडले. सिकंदर उर्फ दादा पोपट कसबे, पद्माकर मारुती वाघमारे, कृष्णा जाधव आणि रुपेश उर्फ सुवर्ण कांबळे अशी मृतांची नावं आहेत. हे चारही जण कदमवस्तीत राहणारे होते. सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles