Thursday, December 26, 2024
Homeजुन्नररुकसाना अन्वर सय्यद यांना तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

रुकसाना अन्वर सय्यद यांना तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

जुन्नर / आनंद कांबळे : जुन्नर तालुका शिक्षक-पालक संघ, लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी आणि जयहिंद शैक्षणिक संकुल कुरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खानापूर च्या उपशिक्षिका रुकसाना अन्वर सय्यद यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२३ प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जितेंद्र बिडवई माजी अध्यक्ष, लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट, गोळेगाव कार्यक्रमाच्या निमित्ताने जयहिंद शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष जितेंद्र शेठ गुंजाळ, जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या समन्वय समितीचे अध्यक्ष प्राध्यापक एकनाथ डोंगरे, लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे अध्यक्ष योगेश रायकर, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष रामभाऊ सातपुते, शिवनेरी लायन्स फाउंडेशनचे अध्यक्ष शिरीष जठार, जयहिंद शैक्षणिक संकुलाच्या संचालिका डॉ.शुभांगी गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय गल्हे, शिक्षक पालक संघाचे सेक्रेटरी एफ.बी.आतार, सरपंच आदिनाथ चव्हाण, जयहिंद शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य डॉ. किरण पैठणकर, आय.टी.आय.चे प्राचार्य सुभाष आंद्रे व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय