Thursday, December 5, 2024
Homeराज्य१० हजार अनुदान मागणीचे ४ हजार अर्ज रिक्षा व टँक्सी चालक संघटना...

१० हजार अनुदान मागणीचे ४ हजार अर्ज रिक्षा व टँक्सी चालक संघटना सिटूमार्फत जिल्हाधिकारी सुरज मांढरे साहेब यांना सादर – डॉ.डी.एल.कराड

नाशिक (प्रतिनिधी) :- रिक्षा खरेदी करिता घेतलेले सरकारी, सहकारी, खाजगी वित्तीय संस्थांच्या कर्जावरील व्याज माफ करून रिक्षाचालकांचे कर्ज पुनर्गठित करावे,गेल्या तीन महिन्यांपासून ऑटो रिक्षा बंद असल्याने या ऑटो रिक्षांचा विमा, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, प्रदूषण प्रमाणपत्र, नूतनीकरण परवाना, नुतनीकरण व वाहनाची आयुमर्यादा एक वर्षाने वाढवून द्यावी, रिक्षा चालक मालक यांच्याकरिता कल्याणकारी मंडळाची स्थापना करून मंडळाद्वारे आरोग्य, शिक्षण, निवारा, वृद्धापकाळातील उदरनिर्वाह निर्वाहभत्ता द्यावा आदी मागणीचे निवेदन आज सिटू प्रणित नाशिक जिल्हा रिक्षा/टक्सी चालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

रिक्षा-टँक्सी चालकांच्या मागण्या मान्य न झाल्यास ३ जुलै रोजी देशव्यापी आंदोलन करणार. डॉ. डी.एल.कराड सीटू, राष्ट्रीय उपाध्यक्ष 

संपूर्ण देशभरात कोविड-१९ या साथीच्या रोगांमुळे लॉक डाऊन संचारबंदी जाहीर करण्यात आली. जवळपास तीन महिन्यांपासून रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. शासनाच्या व परिवहन विभागाच्या विविध नियमानुसार शासनास महसूल अदा करणारा रिक्षाचालक याकाळात उपासमारीने त्रस्त झाला. लॉक डाऊन संपल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत प्रवासी वाहतुकीवर निर्बंध आणल्याने पुरेसा व्यवसायही नाही. या कठीण काळात रिक्षाचालकाला शासनाच्या मदतीची व सहकार्याची अत्यंत आवश्यकता असूनही शासनाकडून काहीही सहकार्य मिळाले नाही.

त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील ४ हजार रिक्षाचालकांचे अनुदान/सहाय्य मागणी चे विनंती अर्ज माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे निवेदनसोबत देण्यात आले. या अर्जाद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आर्थिक सहाय्य करण्याची मागणी केली आहे. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सुरज मांढरे साहेब सविस्तर चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

यावेळी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी.एल.कराड, सिटू जिल्हाध्यक्ष सिताराम ठोंबरे, माजी नगरसेवक एड.तानाजी जायभावे, रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे सरचिटणीस संजय पवार, दिनेश सातभाई ,भिवाजी भावले , संतोष काकडे,तुकाराम सोनजे, एड.भूषण सातळे संदीप खैरनार आदीसह मोठ्या संख्येने रिक्षा टॅक्सीचालक उपस्थित होते.


संबंधित लेख

लोकप्रिय