Monday, December 23, 2024
Homeग्रामीणरिक्षा चालकांनी सुचनांचे पालन करणे आवश्यक; क्रांती रिक्षा सेनेची एपीआय संतोष पाटील...

रिक्षा चालकांनी सुचनांचे पालन करणे आवश्यक; क्रांती रिक्षा सेनेची एपीआय संतोष पाटील यांच्यासोबत चर्चा


पिंपरी चिंचवड
 पिंपरी वाहतूक विभाग येथे आज (दि.२३) रोजी एपीआय संतोष पाटील यांच्या उपस्थितीत क्रांती रिक्षा सेनेच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा संपन्न झाली. यावेळी रिक्षा चालकांनी खालील सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे पाटील म्हणाले 

रिक्षा चालकांनी खालील सूचनांचे पालन करणे आवश्यक :

● रिक्षा थांबवताना रिक्षा स्टँड वरच थांबवावी.

● रिक्षा चालकाकडे रिक्षाची सर्व कागदपत्रे जवळ असणे आवश्यक आहे. (ज्या मध्ये आरसीबुक, परमिट, इन्शुरन्स)

● रिक्षा चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स व बॅच बिल्ला असणे बंधनकारक आहे.

● रिक्षा चालकाकडे थ्री व्हीलर वाहन चालविण्याचे लायसन्स असणे आवश्यक आहे.

● रिक्षा चालकाने चालकाच्या बाजूला प्रवासी बसु नये.

● परमिट प्रमाणे प्रवाशी वाहतूक करावी.

● रिक्षा चालकांनी RTO नियमावली प्रमाणे ड्रेस परिधान करावा.

● रिक्षा मध्ये पॅसेंजर घेताना रिक्षा रोड चे कडेला उभी करूनच पॅसेंजर घेण्यात यावे. तसेच उतरवताना डाव्या बाजूनेच उतरविण्यास सांगितले पाहिजे.

● प्रवाशी रिक्षा मध्ये बसल्यानंतर रिक्षा मीटर चालू करावे.

● रिक्षा बस स्टँड जवळ उभी करू नये.

● ज्या ठिकाणी रिक्षा पार्कींग स्टँड आहेत त्याच ठिकाणी रिक्षा पार्किंग करावी. इतर ठिकाणी पार्कींग करू नये.

● रिक्षा स्टँड मधील सर्व सदस्यांची माहिती वाहतूक शाखेत जमा करावी.

● पार्कींग चे ठिकाणी रिक्षा पार्कींग करतांना एका मागे एक या प्रमाणे रिक्षा पार्कींग करावी. डबल लाईन मध्ये पार्कींग करू नये.

● पादचारी जाणाऱ्या रोडवर रिक्षा पार्क करू नये तसेच तेथे थांबू नये.

● रिक्षा चालकाने प्रवाशासोबत वर्तन चांगले ठेवावे.

● रिक्षा चालकाने विरुद्ध दिशेने रिक्षा चालू नये.

● मद्य प्राशन करून रिक्षा चालू नये.

● रिक्षा मध्ये कर्कश हॉर्न किंवा साऊंड लावण्यात येऊ नये.

● संशयीत इसम रिक्षा मध्ये बसल्यास किंवा आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा.

● प्रवाशाचे साहित्य रिक्षा मध्ये विसरल्यास जवळच्या पोलीस स्टेशन येथे ते साहित्य जमा करावे.

● रिक्षा चालकाने, रिक्षा मालकांकडून भाडे तत्वावर रिक्षा चालविण्यासाठी घेताना प्रथम रिक्षा ची सर्व कागदपत्रे पडताळणी करूनच रिक्षा चालविण्यासाठी घ्यावा. तसेच त्या रीक्षाची सर्व कागदपत्रे सोबत ठेवावी.

● रिक्षा चालकाने स्वतः व प्रवाशांनी मास्क चा वापर करावा. जे प्रवाशी मास्क चा वापर करणार नाहीत त्यांना मास्क वापरण्याबाबत सांगावे.

● कोणत्याही प्रकारची घटना तुमच्या समोर घडत असेल किंवा घडली व त्याची कल्पना  असेल तर त्याची माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी.

संबंधित लेख

लोकप्रिय