पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:स्फूर्ती स्पोर्टस फाउंडेशन वाकड,याच्यावतीने 23 व 24 डिसेंबर 2023 रोजी भोर येथे स्वमग्न मुलांचे दोन दिवसांचे निवासी शिबीर संपन्न झाले.या शिबिरामध्ये एकूण 17 स्वमग्न मुले सहभागी झाली होती.या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांनी,ट्रेकिंग ,निसर्ग भ्रमंती,कॅम्प फायर,रॉक क्लाइंबिंग,पोहणे, ॲनिमल थेरपी,यासह मातीच्या घरात राहण्याचा व चुलीवरचे ग्रामीण जेवण्याचा आस्वाद घेतला.
स्फूर्ती स्पोर्ट फाउंडेशन ही स्वमग्न मुलांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. स्फूर्ती स्पोर्ट क्लब तर्फे ऑटिझम मुलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात.या निवासी शिबीरा मध्ये विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सानिध्यात खूप आनंद घेतला.भोर येथील भाट घर धरणाच्या बॅक वॉटर परिसरात श्रीमती प्रिया भालचंद्र यांच्या फॉर्म हाऊस मध्ये याचं नियोजन करण्यात आले होते.
या निवासी शिबिराचे आयोजन क्रीडा प्रशिक्षक श्री विकास जगताप व श्री ऋषिकेश मुसूडगे यांनी केले होते त्यांना श्री योगेश आढाले,पालक प्रतिनिधी श्री धनंजय बालवडकर यांनी सहकार्य केले.या निवासी शिबिरासाठी महाराष्ट्र स्पोर्ट फेडरेशन ऑफ ऑटिझम चे कार्यवाह श्री रमेश मुसूडगे यांनी मार्गदर्शन केले.