पुणे : राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) शालेय पुस्तकांमधून काही विषय हटविल्याबद्दल मुख्य सल्लागारांनी आक्षेप नोंदविला आहे. तसेच मुख्य सल्लागार म्हणून असलेले नावे आणण्याची मागणी देखील सल्लागारांनी केली आहे.
२००६-२००७ मध्ये इयत्ता नववी ते बारावीच्या राज्यशास्त्र विषयाच्या पुस्तकांसाठी मुख्य सल्लागार म्हणून काम केलेले सुहास पळशीकर आणि योगेंद्र यादव यांनी एनसीईआरटी च्या संचालकांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.
एनसीईआरटीने पुस्तकांमध्ये अनेक बदल केले आहेत आणि तर्कशुद्धीकरणाच्या निकषावर या बदलांचे समर्थन केले आहे. इथे कुठल्याप्रकारचे अध्यापनशास्त्रीय तर्कावर आधारित काम पाहायला मिळत नाही. पुस्तकातून असंख्य अतार्किक गोष्टी वगळण्यात आल्या आहेत. आमच्याशी सल्लामसलत करणे किंवा बदलाबाबत कळविण्याचेदेखील सौजन्य दाखविण्यात आले नाही, असेही योगेंद्र यादव यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.
एनसीईआरटीने इतर तज्ज्ञांशी याबाबत सल्लामसलत करुन या गोष्टी वगळण्याचा निर्णय घेतला असेल तरीही आम्ही त्याच्याशी असहमत आहोत. प्रत्येक पुस्तक तर्कातून तयार होते. पण पुस्तकातील गोष्टी वगळल्याने त्या पुस्तकाच्या मूळ उद्देशाचे उल्लंघन केल्यासारखे आहे. शिक्षण हे पुस्तकाच्या आधारावरच मिळते. शैक्षणिक अकार्यक्षम अशा पुस्तकांवर आमची नावे नमूद असावीत ही आमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
तसेच ९ ते १२ वीच्या राज्यशास्त्रातील सर्व पुस्तकांमधून मुख्य सल्लागार म्हणून आमची नावे हटवावीत. आमच्या नावांचा पुस्तकांमध्येही वापर केला जाऊ नये, असे प्रा. सुहास पळशीकर आणि योगेंद्र यादव यांनी पत्रात नमूद केले आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी
ब्रेकिंग : Facebook आणि Instagram वापरण्यासाठी आता मोजावे लागणार पैसै, वाचा म्हटलंय कंपनीने
गावाचा विकास साधायचाय ? चला तर समजून घेऊया सर्वंकष ग्रामविकास आराखडा…
आदिवासी विभागांतर्गत विद्यार्थ्यांसाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘स्वयम्’ योजना’ वाचा सविस्तर!
‘आया बहिणी या सरकारच्या राज्यात सुरक्षित नाहीत’, आव्हाड म्हणाले, ‘धार्मिक गोष्टींच्या राजकारण…’
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सहायक उद्यान निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
नोकरीच्या बातम्या वाचा :
ब्रेकिंग : वन विभागात 2,412 पदांची मोठी भरती
श्री साईबाबा संस्थान, शिर्डी अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार अंतर्गत विविध पदांची भरती
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, श्रीगोंदा अंतर्गत विविध पदांची भरती