Monday, March 17, 2025

दिलासादायक : जुन्नर तालुक्यातील करोना रुग्णांची संख्या होतेय कमी, आज आढळले २५ रूग्ण

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील नागरिकांसाठी करोना संदर्भात एक दिलासादायक बातमी आहे. तालुक्यातील करोनाच्या रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. जुन्नर तालुक्यात आज २५ करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात सध्या ५०४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आता पर्यंत ६७४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज अहिनवेवाडी ५, ओतूर ४, आळे ३, सावरगाव ३, वारूळवाडी २, कुरण २, हिवरे खुर्द १, डिंगोरे १, बस्ती १, कुमशेत १, वडज १, जुन्नर नगर परिषद १ असे एकूण २५ रुग्ण आज आढळून आले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles