Friday, October 18, 2024
Homeजुन्नरJunnar : अखिल जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी रविंद्र डुंबरे व...

Junnar : अखिल जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी रविंद्र डुंबरे व सरचिटणीसपदी रामदास गवारी यांची बिनविरोध निवड

जुन्नर / आनंद कांबळे : अखिल जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन 14 जुलै 2024 रोजी सन 2024 ते 2027 नूतन कार्यकारीणी आस्वाद लॉन्स नगर कल्याण हायवे पिंपरी पेंढार तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. (Junnar)

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक व सल्लागार आनंदा मांडवे अखिल शिक्षक संघ हे होते. संघटनेच्या नियमानुसार अध्यक्ष रविंद्र डुंबरे, सरचिटणीस रामदास गवारी व कार्याध्यक्ष राजेंद्र बेलवटे व एक महिला प्रतिनिधी यांची निवड करण्यात आली असून पुढील कार्यकारिणीचा विस्तार लगेचच पुढील सभेत करण्यात येत आहे व त्याच अनुषंगाने पुढील कार्यकारीणीचा विस्तार करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री.अनिलराव महाजन, शिवाजीराव वाळके मा. जिल्हाध्यक्ष अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ श्री किरणराव गावडे माजी जिल्हाध्यक्ष व नेते, हनुमान हांडे राज्य प्रतिनिधी तर जिल्हा कार्यकारणीचे जिल्हाध्यक्ष सुभाषराव मोहरे व सुरेश थोरात जिल्हासरचिटणीस तर साधनाताई खोमणे अध्यक्षा महिला आघाडी अखिल पुणे जिल्हा त्याप्रमाणे बाळासाहेब गिलबिले जिल्हा प्रतिनिधी सरला फुंदे संघटक महिला आघाडी अशोक पठारे अध्यक्ष शिरूर तालुका दत्तात्रय बारणे अध्यक्ष खेड तालुका केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष दुंदा भालिंगे मा विस्तार अधिकारी माधुरी शेलार, नामदेव दिघे, स्वाती वामन व गणपत रेंगडे उपस्थित होते. (Junnar)

मागील कालावधीत सेवानिवृत्त सर्व शिक्षक बांधवाचा देखिल सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने विलास रावते, सतीश बोरकर, पांडुरंग भांगे, कृष्णा तुरे, किसन बांबंळे, तुकाराम डामसे व भिमाजी कोंदे यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या निमित्ताने सुनील कुऱ्हाडे मा संचालक शिक्षक पतसंस्था जुन्नर, शिरूरहून सुभाष चव्हाण, सुभाष थोरात, अरुण खोमणे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला आघाडीच्या साधनाताई खोमणे, राज्य उपाध्यक्ष अनिल महाजन व सर्वस्वी शिवाजीराव वाळके यांनी संघटनेबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. (Junnar)

तसेच तालुक्यातील या निवडीस शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने विजय कुऱ्हाडे संचालक शिक्षक पतसंस्था, दे.ल.हाडवळे, कवी सुनिल शेलार, सलीम शेख स्वाती कुऱ्हाडे, कल्पना फापाळे यांच्या सह तालुक्यातील शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्वांचे स्वागत सत्कार संघटनेच्या वतीने त्यांना सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. तर सेवानिवृत्त शिक्षकांमध्ये स्वाती वामन, उषा काळे, ना. ज. दिघे, कृष्णा तुरे, भिमाजी कोंदे , विलास रावते, पांडुरंग भांगे, आनंदा मांडवे किसन बांबळे, तुकाराम डामसे, भगवान ढोले यांच्यासह तीस सेवानिवृत्त शिक्षक बंधू भगिनींचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी सुत्रसंचालन तालुका अध्यक्ष विवेक हांडे तर आभार सरचिटणीस तुकाराम हगवणे यांनी केले. नियोजन सहचिटणीस निलेश शिंगोटे, शुभांगी शिंगोटे, छाया डुंबरे, आरती मोहरे, सुमन उतळे, अनिल शिंदे, विभाग प्रमुख भरत रोंगटे, संघटक ज्ञानदेव दाभाडे, सुदाम उतळे मुख्याध्यापक लक्ष्मण लांडे, खे.ना.मोरे, पपीता हांडे, ओतूर दोन शाळेचे मुख्याध्यापक त्यांचा सर्व सहकारी शिक्षक वृंद व तालुक्यातील बहुतांश शिक्षक कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : अजित पवारांना मोठा धक्का ; अनेक नेत्यांचा शरद पवार गटात पक्ष प्रवेश

बेरोजगारीचे धक्कादायक वास्तव ! मुंबईत 600 लोडर्स पदासाठी तब्बल 25,000 तरूणांची गर्दी

मोठी बातमी : लाडकी बहीण’ योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना, ‘हा’ मिळणार लाभ

केदारनाथमधून तब्बल 228 किलो सोने गायब, शंकराचार्यांनी केला गंभीर आरोप

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा, केल्या ‘या’ घोषणा

अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना दुधाळ जनावरे गट वाटपाची योजना

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या जूनमधील सोडतीचा निकाल जाहीर

संबंधित लेख

लोकप्रिय