पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : रोटरी क्लब ऑफ़ निगडी च्या वतीने “रनाथॉन ऑफ होप” या मॅरेथॉनचे आयोजन केले असल्याची माहिती अध्यक्ष हरबिंदर सिंग, रनाथॉन संचालक विजय काळभोर यांनी दिली. “Rathon of Hope” by Rotary Club of Nigdi on 8th October, Nigdi
या स्पर्धेची सुरुवात दि. ८ ऑक्टोबर रोजी स.५ :३० वा निगडी भेळ चौक,येथील नियोजित महापौर निवास मैदान या ठिकाणी पासून प्रारंभ होईल. या स्पर्धेत सुमारे ५ हजार स्पर्धक सहभागी होत आहे.
स्पर्धकांना २१ किमी, १० किमी, ५ किमी आणि कॉर्पोरेट ५ किमी, फॅमिली गटात २ किमी अंतर गटात धावता येईल. तसेच महिला व ४५ वर्षे वरील वयोगटातील स्पर्धकांना स्वतंत्र बक्षिसे देण्यात येणार आहे. या रनाथॉन स्पर्धेचे यंदा आंतरराष्ट्रीय मिस्टर युनिव्हर्स शरीर सौष्ठव स्पर्धा गाजवलेले संग्राम चौगुले ब्रॅण्ड ॲंबेसिडर असून ऱनाथॉन स्पर्धेचे यंदा सलग १२ वे वर्ष आहे, अशी माहिती रनाथॉनचे संचालक विजय काळभोर यांनी दिली.

या स्पर्धेच्या माध्यमातून संकलित होणाऱ्या निधीतून रोटरी क्लब ऑफ़ निगडी तर्फे ग्रामीण भागात काही समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये आनंदी शाळा, आनंदी ग्राम, वैद्यकीय प्रकल्पाचा समावेश आहे. यासाठी हा निधी खर्च केला जाणार असल्याची माहिती निगडी क्लबचे अध्यक्ष हरबिंदर सिंग यांनी दिली.
या सामाजिक उपक्रमात जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी व्हावेत असे आवाहन संयोजकांच्या वतीने विजय काळभोर यांनी केले. सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी विजय काळभोर – 9881371893 , सविता राजापूरकर – 9850588884 या क्रमांकावर संपर्क साधावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.