रामटेक (नागपूर) : अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने पुकारलेला ‘भारत बंद’ यशस्वी करण्याचे आवहान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉम्रेड राजू हटवार यांनी केले आहे.
बंद यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभा, राज्य किसान, सिटु व आयटक या संघटनांंनी नागरिकांना ‘भारत बंद’ यशस्वी करण्याचेही आवहान केले आहे. यासाठी रामटेख येथील गांधी चौकात सकाळी 10 वाजता निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
गेल्या 11 दिवसापासून कडकडीत थंडीत दिल्लीच्या सिमेवर हजारो शेतकरी तीन शेतकरी कायद्याच्या विरोधात आंदोलन करीत आहे. हे तीन कायदे जोपर्यंत केंद्र सरकार वापस घेत नाहीत तो पर्यत शेतकरी हटणार नाहीत, याकरिता 6 महिने पुरेल इतके राशन पाण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांचाच नाही तर अन्न सुरक्षापासून जनतेला वंचित करणारे तीन कायदे मोदी सरकारने फक्त अडाणी, अंबानी या सारख्या उद्योगपतींना याचा फायदा करण्याकरिता संसदेत चर्चा न करता बहुमताने तर राज्यसभेत गोंधळ घालून मंजूर करवून घेतले आहेत, असेही हटवार यांनी सांगितले.