Home राज्य Ramdas Kadam : रामदास कदमांचा भाजपवर जोरदार प्रहार, दुपारी मुलगा प्रदूषण मंडळाच्या...

Ramdas Kadam : रामदास कदमांचा भाजपवर जोरदार प्रहार, दुपारी मुलगा प्रदूषण मंडळाच्या अध्यक्षध्यपदावर !

Ramdas Kadam: Ramdas Kadam attacked the BJP, in the afternoon the son became the chairman of the pollution board!

Ramdas Kadam : शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी 7 मार्चला लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला (शिंदे) जागावाटपामध्ये दुय्यम स्थान मिळत असल्यावरून भाजपवर प्रहार केला होता. रामदास कदम (Ramdas Kadam) म्हटले होते की, “केसाने गळा कापून विश्वासघात करू नका, असा इशारा त्यांनी दिला होता. Ramdas Kadam’s criticism of BJP, son chairmanship of Pollution Board!

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रामदास कदम यांच्या टीकेमुळे महायुतीच्या गोटात खळबळ उडाली. यानंतर काही तासातच त्यांचे चिरंजीव सिद्धेश कदम (Siddhesh Kadam) यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (Maharashtra Pollution Control Board) अध्यक्षध्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सिद्धेश कदम मुंबईतून लोकसभेसाठी तयारी करत असल्याची चर्चा होती. मात्र शिवसेना (शिंदे) ला मिळत असलेल्या दुय्यम स्थानावरून रामदास कदम यांनी भाजपला घेरले होते. तसेच आम्ही मोदी शहांकडे बघून आम्ही भाजपमध्ये आलो असल्याचेही ते म्हणाले होते. कदमांच्या या प्रहारानंतर सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षध्यपदी नियुक्ती केली आहे.

तसेच, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुर्वीचे असलेले अध्यक्ष ए. एल. जऱ्हाड हे अनेक दिवसांपासून गैरहजर असल्याने त्यांना पदावरून बाजूला केल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा :

ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार भाजपात जाणार का? रोहित पवारांची पोस्ट चर्चेत

ब्रेकिंग : रोहित पवार यांच्यावर ईडीची मोठी कारवाई; शरद पवार गटाला झटका

मोठी बातमी : मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारला न्यायालयाचे महत्वाचे निर्देश

हो मला आदित्यला मुख्यमंत्री करायचंय… उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान

घरगुती गॅस च्या किंमती तब्बल इतक्या रुपयांनी होणार कमी

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विविध उपक्रम

उद्धव ठाकरे यांच्याकडून नितीन गडकरी यांना मोठी ऑफर

Exit mobile version