Railway Bonus : मोदी सरकारने नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी दिली आहे. केंद्र सरकारने रेल्वे विभागातील 11.72 लाख कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर केला आहे, ज्यामुळे त्यांची यंदाची दिवाळी धुमधडाक्यात साजरी होणार आहे. या निर्णयानुसार, रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाइतका बोनस देण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांच्या पगारापेक्षा जास्त रक्कम बोनस म्हणून मिळणार आहे. एकूण 2029 कोटी रुपयांचा खर्च करुन हा बोनस वितरित केला जाणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे.
केंद्र सरकारने या बोनसला प्रोडक्टिव्हीटी लिंक्ड रिवॉर्ड असं म्हटलं आहे. या बोनसचा फायदा ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर्स (गार्ड्स), स्टेशन मास्तर, सुपरवायजर्स, टेक्निशियन हेल्पर, पॉइंट्समन आदी विविध पदांवरील कर्मचाऱ्यांना होणार आहे. कर्मचाऱ्यांना कमाल 18 हजार रुपये बोनस मिळू शकतो. रेल्वे विभागाचे काम आणखी सुधारावे तसेच रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून हे बोनस दरवर्षी जाहीर केले जाते.
दरवर्षी दुर्गा पूजा आणि दिवाळीच्या सणांदरम्यान या बोनसचे वितरण केले जाते. यंदाही बोनस घोषणेमुळे रेल्वे विभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, लाखो रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदमयी होणार आहे.
Railway Bonus
हेही वाचा :
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
स्टेट बँकेची बनावट शाखा उघडून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार
महाराष्ट्रातील या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस होणार बंद, ही आहेत कारणे
धक्कादायक : झारखंडमध्ये बॉम्बस्फोटाने उडवला रेल्वे ट्रॅक
आमदार अतुल बेनके यांच्या समर्थकांनी घेतली शरद पवारांची भेट, पवारांकडे केली ‘ही’ मागणी
दिवाळीपूर्वीच महागाईचा झटका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर
नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल
अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात उपचार सुरू
मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम
महाविद्यालयाच्या आवारात युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा दाखल
मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप
धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू
भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार