Thursday, December 5, 2024
Homeराजकारणराहुल गांधी यांनी घेतली सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबियांची भेट, आप सरकारवर केली...

राहुल गांधी यांनी घेतली सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबियांची भेट, आप सरकारवर केली जोरदार टीका

नवी दिल्ली : पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांची २९ मे रोजी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुसेवाला यांना श्रद्धांजली वाहिली.

पंजाब सरकारने सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशीच मुसेवाला यांची हत्या करण्यात आली. ही घटना घडली तेव्हा राहुल गांधी परदेशात होते आणि गेल्या आठवड्यात ते मायदेशी परतले. आज राहुल गांधी यांनी पंजाबमधील मानसा गावात जाऊन मुसेवाला यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच कुटुंबियांशी सुमारे ४५ मिनिटे चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वाडिंग, प्रताप सिंग बाजवा आणि माजी उपमुख्यमंत्री अंबिका सोनी उपस्थित होते.

नवीन भरती : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

सीमा रस्ते संघटन (BRO) मध्ये 876 जागांसाठी भरती, पुणे येथे 10 वी, 12 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज !

मुसेवाला यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत पंजाबमधील आप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या आई-वडिलांना ज्या दु:खाचा सामना करावा लागत आहे, ते शब्दात सांगणे कठीण आहे. त्यांना न्याय देणे आमचे कर्तव्य आहे आणि आम्ही पार पाडू. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. आप सरकार पंजाबमध्ये शांतता राखण्यात अपयशी ठरले आहे, या शब्दांत राहुल गांधी यांनी आप सरकारवर हल्लाबोल केला आहे.

सिद्धू मूसवाला यांनी अलीकडेच झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर मानसा गावातून निवडणूक लढवली होती.

ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 पगाराची नोकरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 288 पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध जिल्ह्यांत 145 पदांसाठी भरती, 18000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अंतर्गत 100 पदांसाठी भरती, 30000 ते 80000 पगाराची नोकरी

संबंधित लेख

लोकप्रिय