Monday, December 23, 2024
Homeराष्ट्रीयप्रचारसभेत राहुल गांधीनी केला मोदींचा उल्लेख 'पनौती मोदी'; भाजप काँग्रेस आमने-सामने 

प्रचारसभेत राहुल गांधीनी केला मोदींचा उल्लेख ‘पनौती मोदी’; भाजप काँग्रेस आमने-सामने 

जालोर : नुकत्याच गुजरात येथे पार पडलरल्या वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत भारताला पराभव पत्करावा लागला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियमवर स्वतः उपस्थित होते, वर्ड कप भारत जिंकणार अशीच समाज माध्यमावर देशभर चर्चा होती. यावेळी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी काही राज्यात सुरू आहे, राजकीय प्रचारसभेत राहुल गांधी व नरेंद्र मोदी यांच्यात प्रचाराची लढाई सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 नोव्हेंबर रोजी मध्यप्रदेशच्या बैतुल जिल्ह्यातील प्रचार सभेत राहुल गांधी यांना उद्देशून ‘मूर्खों के सरदार’ म्हटले होते. एकूण निवडणुकीत प्रचारात हे दोन्ही नेते अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत.

त्यामुळे सोशल मीडियावर रिल्स फिरत आहेत. मंगळवारी आगामी निवडणुकांच्या प्रचारासाठी राजस्थानमध्ये जालोर येथे प्रचारसभेत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली, संपूर्ण सामना चांगला खेळला तरी अखेरच्या क्षणाला ऑस्ट्रेलियाने भारताला सहा विकेटवर हरवलं वर्ल्ड कप सामना पाहण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. मात्र, भारताचा पराभव झाल्यावर सध्या सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी यांना पनौती म्हणून संबोधले जात आहे. राहुल गांधींनी पनौती तिकडे गेली म्हणून चांगले खेळुनही अपशकुन झाला अशा आशयाची टीका केली.

वर्ड कप जिंकणार त्यामुळे त्याचा निवडणुकीत प्रचारासाठी इव्हेंट करण्यासाठी भाजपने बॅनर्स, आतषबाजी आदी कार्यक्रमाची तयारी केली होती.

 मात्र “पंतप्रधान मोदी मॅच पाहिला गेले नसते तर बरं झालं असतं आणि वर्ड कप ला पनौती लागली अशा प्रकारची टीका  अशी टीका मोदींसंदर्भात करण्यात येत आहे. त्यानंतर आज राहुल गांधी यांनी देखील मोदींनी PM म्हणजे ‘पनौती मोदी’ असा प्रचारसभेत उल्लेख केला.

राहुल गांधींना ‘मूर्खों के सरदार’ म्हटल्यावर काँग्रेस नेत्यांनी पलटवार केले होते. राहुल गांधींनी पनौती असा उल्लेख करताच भाजपच्या गोटातून काँग्रेसवर टीका होत आहे, सोशल मीडियावर मोदींचा अशाच पद्धतीने ट्रोलिंग केले जात आहे.

Mahaegs Maharashtra Recruitment
संबंधित लेख

लोकप्रिय