Thursday, January 9, 2025
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : पूर्णानगर, घरकुलधारकांचा गणेशोत्सव होणार गोड 

PCMC : पूर्णानगर, घरकुलधारकांचा गणेशोत्सव होणार गोड 

उर्वरित शिधापत्रिका धारकांनी लवकर लाभ घ्यावा; ज्योती गोफणे यांचे आवाहन

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : पुढील आठवड्यापासून सर्वत्र गौरी-गणपतीचे आगमण होईल. त्यामुळे सर्वत्र नवचैतन्य, उत्साह दिसून येईल. या उत्सावात गरीबांना सुद्धा सहभागी होता यावे यासाठी पूर्णानगर, घरकुल भागातील रेशन कार्डधारकांना आनंदाच्या शिधाचे वाटप करण्यात आले आहे. ज्यांनी अद्याप लाभ घेतलेला नाही अशा शिधा पत्रिका धारकांनी लवकर लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहर कार्याध्यक्षा ज्योती गोफणे यांनी केले आहे. Purnanagar, Ganeshotsav of Gharkul holders will be sweet

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गतbराज्यातील लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो या प्रमाणात रवा, चनाडाळ, साखव व एक लीटर या परिमाणात खाद्यतेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेले शिधाजिन्नस संच ‘आनंदाचा शिधा’ गौरी-गणपती उत्सवानिमित्त वितरीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सदर आनंदाचा शिधा एक ते ३० सप्टेंबर या कालावधीत सवलतीच्या दराने वितरीत करण्यात येईल. पात्र शिधापत्रिकाधारकाला ई-पॉस प्रणालीद्वारे प्रति संच शंभर रुपये या सवलतीच्या दरात वितरण करण्यात येत आहे.

यासंदर्भात बोलताना स्वस्त धान्य वितरक तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस अजित पवार गटाच्या शहर कार्याध्यक्षा ज्योती गोफणे म्हणाल्या की, राज्यातील शिंदे, फडणवीस, पवार सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील करोडो नागरिकांना याचा लाभ होणार आहे. आमच्याकडे जवळपास ८०० शिधापत्रिका धारक आहेत. त्यापैकी सुमारे ६०० धारकांनी या ‘आनंदाचा शिधा’चा लाभ घेतला आहे. उर्वरित शिधापत्रिका धारकांनीही लवकरात लवकर याचा लाभ घ्यावा असे आवाहन आम्ही केले आहे.

दरम्यान, हा आनंदाचा शिधा वेळेत पोहचविल्याबद्दल झोनल अधिकारी गजानन देशमुख, पुणे अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गीते आणि भोसरी विभाग पुरवठा निरीक्षक श्रीमती साबळे यांचेही ज्योती गोफणे यांनी आभार व्यक्त केले.

संबंधित लेख

लोकप्रिय