Tuesday, March 25, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Award : शैला थोरात यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार

पुणे : थोरांदळे (ता. आंबेगाव) जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा शाळेतील शिक्षिका शैला रवींद्र थोरात यांना पुणे जिल्हा परिषदेच्या सन २०२२/२३ चा गुणवंत शिक्षक पुरस्काराने उपमुख्यमंत्री अजित पवार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांच्या हस्ते गौरविण्यात आले. District Model Teacher Award to Shaila Thorat

---Advertisement---

यावेळी गटशिक्षणाधिकारी सविता माळी विस्तार अधिकारी गजानन पुरी, केंद्रप्रमुख मनोहर सांगळे, साहेबराव शिंदे, सरपंच जे. डी. टेमगिरे, नीलमताई टेमगिरे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन टेमगिरे, सिताराम गुंड, रामदास टेमगिरे उपस्थित होते.

गेल्या २६ वर्षापासून त्या अध्यापनाचे काम करत आहेत. शंभर टक्के पट नोंदणी व 100% उपस्थिती, गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न, डिजिटल शाळा, परसबाग, यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवात जिल्हा पातळीवर खो खो मध्ये प्रथम क्रमांक, योगासने, संगीत कवायत, श्रम प्रतिष्ठा व वृक्षारोपण आदी उपक्रमांची त्यांनी प्रभावीपणे अंमलबजावणी केली.

---Advertisement---

पुणे जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश टेमगिरे, उपाध्यक्ष मंगेश फुटाणे, सदस्य खंडू पुंडे व थोरांदळे ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles