पुणे (क्रांतीकुमार कडुलकर) – खडकी येथील सेंट्रल ए एफ व्ही डेपो मधील एमटीएसएसडी वर्कर्स युनियनचा 77 वा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे राज्याचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक अशोक धिवरे साहेब उपस्थित होते, त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल एस के एस गौतम साहेबांची ची उपस्थिती होती. (Pune)
10 जानेवारी 1948 रोजी स्थापन झालेली संरक्षण क्षेत्रातील खडकी येथील एमटीएसएसडी वर्कर्स युनियन शक्तिशाली व बलशाली बनवण्यात साथी बी के बोकील साहेब, साथी के अंड्यापण व साथी प्रकाश गोडसे यांचे मोलाचे योगदान होते. अशोक धिवरे यांनी युनियनला शुभेच्छा देताना सांगितले की, हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन बौद्ध इत्यादी इत्यादी धर्माचे कामगार युनियनच्या झेंड्याखाली एकत्र येऊन काम करणारे क्षेत्र म्हणजे सध्याच्या तर घडीला कामगार संघटना हेच आहे व इथून पुढे ही अस्तित्व टिकून राहणं गरजेचं आहे.(Pune)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2025/01/1000485959-1024x768.jpg)
युनियनचे जनरल सेक्रेटरी विशाल डुंबरे व अध्यक्ष साथी सलीम सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण ननावरे यांनी केले व आभार प्रदर्शन रामचंद्र गवई यांनी केले.
हे ही वाचा :
एसटी प्रवाशांसाठी खूशखबर : लालपरीचे लाईव्ह लोकेशन आता मोबाईलवर मिळणार
१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध
वडीलांनी मोबाईल न दिल्याने मुलाची आत्महत्या, वडिलांनीही संपवलं जीवन
‘लाडकी बहीण’ योजनेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले, मोफत पैसे…
केरळ मंदिर महोत्सवात हत्तीने माणसाला उचलून हवेत फेकले, भीषण व्हिडिओ
तिरुपती बालाजी मंदिरात भगदड: ६ भाविकांचा मृत्यू
पीएम आवास योजना ते पीएम किसान पर्यंत, बजेटमध्ये या सरकारी योजनांना मिळू शकतो बूस्ट