Home पुणे - पिंपरी चिंचवड Alandi : आळंदीत जेष्ठ महिलेस डंपरची धडक ; महिला ठार, नागरिकांचे तीव्र...

Alandi : आळंदीत जेष्ठ महिलेस डंपरची धडक ; महिला ठार, नागरिकांचे तीव्र आंदोलन

Alandi

आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदीत डंपरच्या धडकेने जेष्ठ महिला नागरिक जागेवरच ठार झाल्याने स्थानिक नागरिकांनी पुणे आळंदी रस्त्यावर संतप्त होत पुणे आळंदी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. येथील प्रचंड वाहतूक कोंडी, आणि रस्त्यालगतचे झोपडीधारक नागरिक यांचे पुनर्वसनाचा प्रश्न या अपघाताने एरणीवर आला आहे. (Alandi)

महिलेचा या अपघातात मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांनी डंपर पुढे ठिय्या आंदोलन केले. यावेळी रस्त्याचे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली.

या अपघाताने आळंदीतील विविध प्रश्न एरणीवर आले. या आंदोलना दरम्यान पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत दिघी पोलीस स्टेशन आणि आळंदी दिघी वाहतूक पोलीस प्रशासन यांनी आंदोलन कर्ते नागरिकांचे समवेत सुसंवाद साधून आंदोलन कर्ते यांची समजूत काढत आश्वस्त केले. या नंतर काही तासाने वाहतूक सुरळीत झाली.

या दुर्दैवी अपघातात रस्त्यावरून पायी जात असलेल्या जेष्ठ महिला नागरिक विठाबाई बबन साळुंखे (वय ७२ वर्षे, राहणार आळंदी देवाची, काळेवाडी, चऱ्होली बु, ता. हवेली, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला.

अपघात झाल्याचे समजताच पोलीस अधिकारी, पदाधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळास भेट देत अपघातग्रस्त कुटुंबियांचे सांत्वन करीत आंदोलनकर्ते यांचेशी संवाद साधला.

यावेळी परिसरातील नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. पुणे आळंदी रस्त्यावर देहू फाट्या जवळ पायी जात असलेल्या महिलेस धडक दिली. या दुर्दैवी झालेल्या अपघातात जेष्ठ महिलेचा मृत्यू झाला.

यावेळी नागरिकांनी सांगितले कि, घरे रस्त्या लगत आहेत. या रस्त्यावरून ये – जा करणाऱ्या वाहनां मुळे रहिवासी नागरीकांच्या जीवाला कायम धोका आहे. स्थानिक आळंदी नगरपालिकेने झोपडीधारक सर्व नागरिकांना पर्यायी राहण्याची व्यवस्था कायम स्वरूपी घरकुल देऊन सुरक्षित स्थलांतर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलकांनी खूप वेळ रस्त्यावर ठिय्या देत मागणी लावून धरली. दरम्यान वाहतूक कोंडी झाली. (Alandi)

यावेळी वरिष्ठ पोलीस प्रशासनानाने सुसंवाद साधून मध्यस्थी करीत आंदोलनकर्ते यांना समजावत मार्ग काढण्याचे अनुषंगाने चर्चा केली. यात पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

दरम्यान आळंदी परिसरात डंपरचे अपघात वाढत असून यापूर्वीही आळंदीतील वडगाव रस्ता, पद्मावती रस्ता, प्रदक्षिणा मार्ग, मरकळ रस्त्यावर वाहनांचे अपघात होऊन जीव गेले आहेत.

आळंदी नगरपरिषद, वाहतूक पोलीस आणि रस्ते विकास विभाग यांनी गतीने कामकाज करण्याची मागणी होत आहे. पुणे आळंदी रस्त्यावरील अपघातात ज्येष्ठ नागरिक महिला ठार झाल्याने येथील रस्ते विकासाचा विषय ऐरणीवर आला आहे.

वाहतूक कोंडी आणि नागरिकांची सुरक्षित सुरळीत रहदारी, वाहनतळ पार्किंग, नवीन इमारती सेट बॅक, प्लॅन प्रमाणे मंजूर पार्किंग जागा यावर प्रशासनाने काम करण्याची मागणी नागरिकांची आहे.

आळंदी वडगाव रस्ता, प्रदक्षिणा मार्ग, पद्मावती रस्ता अशा अनेक रस्त्यावर अपघात होवून पादचारी, दुचाकी वाहन चालक यांचे जीव गेले आहेत. (Alandi)

आळंदीतील बाह्यवळण मार्ग, ओढ्यालगतचे पाणंद रस्ते तसेच तीर्थक्षेत्र आळंदी विकास आराखड्यातील मंजूर रस्ते, पुल आणि जोड रस्ते तात्काळ विकसित करण्याची आवश्यकता नागरिकांतून व्यक्त होत आहे.

पुणे आळंदी रस्त्याचे लगतच्या सर्व झोपडी धारकांचे पर्यायी फ्लॅट, जागा, घरकुल देवून अगोदर पुनर्वसन यावर प्राधान्याने कामे हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे उघड झाले आहे.

हे ही वाचा :

एसटी प्रवाशांसाठी खूशखबर : लालपरीचे लाईव्ह लोकेशन आता मोबाईलवर मिळणार

१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध

वडीलांनी मोबाईल न दिल्याने मुलाची आत्महत्या, वडिलांनीही संपवलं जीवन

‘लाडकी बहीण’ योजनेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले, मोफत पैसे…

केरळ मंदिर महोत्सवात हत्तीने माणसाला उचलून हवेत फेकले, भीषण व्हिडिओ

तिरुपती बालाजी मंदिरात भगदड: ६ भाविकांचा मृत्यू

पीएम आवास योजना ते पीएम किसान पर्यंत, बजेटमध्ये या सरकारी योजनांना मिळू शकतो बूस्ट

Exit mobile version