Thursday, December 26, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPune:श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा दिनी 22 जानेवारीला मटण चिकन विक्री बंद ठेवण्याचा कुरेशी...

Pune:श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा दिनी 22 जानेवारीला मटण चिकन विक्री बंद ठेवण्याचा कुरेशी समाजाचा निर्णय

पुणे/क्रांतिकुमार कडुलकर:पुण्यात 22 जानेवारीला प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पुणे शहर कुरेशी समाजातील मटण व चिकन विक्री दुकाने व सर्व व्यवहार बंद करून,प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त लाडू आणि पेढे वाटप करुन या उत्सवात सहभागी होणार आहेत असे कुरेशी समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

२२ जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या उत्साहाने होत असलेला प्राणप्रतिष्ठा सोहळयाचा आनंद कुरेश समाजास होत आहे. श्रीराम हे सर्वधर्मासाठी अत्यंत पुजनीय आहेत. अयोध्येमधील त्यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळयाचा आनंद आणि उत्साह देशभर साजरा केला जात आहे. यासाठी ऑल इंडिया जमीयतुल कुरेश एक्शन कमेटी च्या वतीने २२ जानेवारी ला कुरेशी समाज आपले सर्व व्यवहार बंद करून या कार्यक्रमात आनंद उत्साहाने सहभागी होत आहेत.
अशी माहिती सादिक कुरेशी अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र यांनी दिली आहे.

यावेळी हसन अब्बास कुरेशी अध्यक्ष पुणे शहर ,मेहमूदलाल कुरेशी सेक्रेटरी पुणे शहर आरीफ बशीर कुरेशी उपाध्यक्ष पुणे शहर,वाहिद मजिद कुरेशी ज. सेक्रेटरी पुणे शहर,नियाज अहमद कुरेशी ज. सेक्रेटरी पुणे शहर ,अकबर हनीफ पटेल कार्याध्यक्ष पुणे शहर ,हाजी नासिर कुरेशी सल्लागार ,हाजी शादाब कुरेशी हाजी शरीफ कुरेशी यासह यावेळी पुणे शहरातील कुरेशी समाजाचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते .

संबंधित लेख

लोकप्रिय