Wednesday, December 4, 2024
Homeकृषीपुणे : जुन्नरला द्राक्ष महोत्सवाचे आयोजन

पुणे : जुन्नरला द्राक्ष महोत्सवाचे आयोजन

Photo credit : YouTube/Uttam sadakal

पुणे : विभागीय पर्यटन कार्यालय आणि जुन्नर पर्यटन विकास संस्था यांच्या माध्यमातून जुन्नर द्राक्ष महोत्सव २०२२ चे आयोजन १८ ते २० फेब्रुवारी २०२२ या कालावधीत करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय पर्यटन कार्यालयाचे सहायक संचालक सुप्रिया करमरकर यांनी दिली आहे. 

या महोत्सवात द्राक्ष बाग भेट, जुन्नर हेरिटेज वॉक, वायनरी भेट, पक्षी निरीक्षण उपक्रम, देवराई भेट, नाणेघाट सहल, बोटिंग, ओझर गणपती दर्शन, गीब्सन स्मारक भेट, लेण्याद्री गणपती दर्शन, ताम्हणे संग्रहालय भेट, अंबा अंबिका लेणी समूह भेट, जुन्नर आठवडे बाजार भेट, कॅम्प फायर व मनोरंजनात्मक कार्यक्रम यांचा समावेश असेल. 

या कार्यक्रमासाठी जुन्नर एज्युकेशन सोसायटीअंतर्गत शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या मुख्य मैदानाचा वापर महोत्सव आयोजन करण्यासाठी करण्यात येणार आहे.

व्हिडिओ : अखेर खासदार कोल्हे यांनी शब्द पाळला, “दोन्ही हात सोडून अख्खा घाट बैलजोडीसमोर घोडेस्वारी”

जुन्नर : पेसा क्षेत्रातील अवैध माती उत्खननाबाबत योग्य कारवाई करण्याची मागणी

बेरोजगारी विरोधात डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाची निदर्शने

‘बाप बेटे जेलमध्ये जाणार, कोठडीचे sanitization सुरू’ संजय राऊत यांच्या ट्विटमुळे खळबळ


संबंधित लेख

लोकप्रिय