Pune: बोपदेव घाट परिसरात एका 21 वर्षीय तरुणीवर तिघा मित्रांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोंढवा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी 25 पथकं वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. घटनेच्या तपासात एक महत्त्वाचा अपडेट समोर आला आहे.
गुरुवारी रात्री 11 वाजता ही गंभीर घटना घडली. पीडित तरुणी पुण्यातील एका इव्हेंट मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिकत होती आणि ती तिच्या मित्रासह बोपदेव घाटात गेली होती.याच ठिकाणी आरोपी देखील टु-व्हीलरवर आले होते. या रात्री तीन आरोपी मुलांनी तरुणीसोबत असलेल्या मुलाचा शर्ट काढला. त्याचे पाय बेल्टने बांधून ठेवले आणि गाडीची चवी व मोबाइल देखील काढून घेतला. त्यांच्यापैकी एकाकडे चाकू होता. त्यांनी चाकूचा धाक दाखवत मुलीवर सामूहिक अत्याचार केला. घटनेनंतर आरोपी तिथून पळून गेले. नंतर मुलीने बांधून ठेवलेल्या मित्राला सोडवले.
ही घटना ज्या ठिकाणी घडली तिथे मोबाइल रेंज नाही. तसेच दहा किमी अंतराच्या परिसरात सीसीटीव्ही देखील नसल्याने तपास करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.अशात बोपदेव घाटात सासवडच्या बाजूला तीन संशयितांचं एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे.
सीसीटीव्ही फूटेजमधून संशयित आरोपी तिघे जण दिसत असून पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. घटनेनंतर आरोपी काही मिनिटांनी पुढे जाऊन थांबले असावे, असा संशय पोलिसांना आहे. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज आणि तांत्रिक डाटाच्या मदतीने तपास सुरू केला आहे.
या सर्व घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा समोर आल्यामुळे पुण्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Pune
हेही वाचा :
लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे ‘या’ दिवशी जमा होणार
आदिवासी आमदारांचे मंत्रालयात आंदोलन, मंत्रालयाच्या जाळीवर मारल्या उड्या
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय
स्टेट बँकेची बनावट शाखा उघडून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार
महाराष्ट्रातील या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस होणार बंद, ही आहेत कारणे
धक्कादायक : झारखंडमध्ये बॉम्बस्फोटाने उडवला रेल्वे ट्रॅक
आमदार अतुल बेनके यांच्या समर्थकांनी घेतली शरद पवारांची भेट, पवारांकडे केली ‘ही’ मागणी
दिवाळीपूर्वीच महागाईचा झटका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर
नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल
अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात उपचार सुरू
मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम
महाविद्यालयाच्या आवारात युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा दाखल
मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप