पुणे : पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज तिहेरी कारवाई केली आहे. त्यामुळे शहरासह जिल्हयात प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यामध्ये एका मोठ्या अधिकाऱ्याचा समावेश आहे. शिरूर, तळेगाव दाभाडे व पुण्यातील एका वकिलाचा देखील त्यामध्ये सहभाग असल्याची माहिती सुत्रांकडून समजते.
पिंपरी चिंचवडमधील तळेगाव दाभाडे येथील पालिकेचे सीओ शाम शेट्टी आणि आणखी एका अधिकाऱ्याने 9 लाख रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे. तक्रारीत लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने आज डिमांडचा गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना पकडले असल्याचे सूत्रांकडून समजते.
पहिली कारवाई :
शिवाजी महादु गव्हाणे (वय 56) यांना पकडले आहे. शिवाजी हे शिरूरमधील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात सहकार अधिकारी आहेत. यातील तक्रारदार यांनी त्यांचा सावकारी परवाना नुतणीकरणासाठी अर्ज केला होता. त्यावेळी शिवाजी यांनी 20 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज कारवाईत तडजोडीनंतर 15 हजार रुपये घेताना पकडले आहे.
दुसरी कारवाई :
एका वकिलाला 10 हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यामध्ये महिला तक्रारदार आहेत. त्यांना या महिलेच्या केसमध्ये शासनाने वकील म्हणून नेमले आहे. यावेळी त्यांनी 20 हजार रुपयांची लाच तक्रारदार महिलेकडे केली होती. याबाबत त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यात पडताळणी करण्यात आली. लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज 10 हजार रुपये घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.