Saturday, December 7, 2024
Homeकृषीपुणे : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात भात पेरणीला सुरुवात

पुणे : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात भात पेरणीला सुरुवात

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागात  भात पेरणीला सुरुवात झाली आहे. जुन्नर हा घाटमाथ्यावरील भाग असल्यामुळे येथे लवकरच पावसाला सुरुवात होत असते. घाटघर, अंजनावळे, फांगुळगव्हाण, जळवंडी या गावांमध्ये लवकरच पेरणीला सुरू होता आहे. 

यावर्षी लवकरच पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीबरोबर पेरणीलाही सुरुवात झाली आहे. अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी अवकाळीमुळे शेतीच्या मशागतीची कामांना वेग आला आहे.

लॉकडाऊनमुळे खते, बि-बियांणांसाठी कसरत 

लॉकडाऊन असल्यामुळे खते, बि-बियाणांसाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. सरकारने खते, बि-बियाणे दुकानांना परवानगी दिली असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

सुधारित वाणांकडे शेतकऱ्यांचा कल, पारंपरिक वाणांना दिला जातोय फाटा

तालुक्यात शेती मशागत, पेरणीची लगभग चालू आहे. तसेच खते, बि-बियाणांची मागणी देखील वाढत आहे. यावर्षी पश्चिम आदिवासी भागातील शेतकरीचा सुधारित वाणांकडे कल वाढला आहे. सुधारित वाणांमध्ये सध्या बाजारात इंद्रायणी, फुले समृद्धी, कोलम, दप्तरी ही वाणं उपलब्ध आहेत. पुर्वी रायभोग, आंबेमोहर, जिरीयल, कोळंबा, जिरीयल, खडक्या या पारंपरिक वाणांकडे शेतकऱ्यांचा कल होता. 

संपादन – शिवाजी लोखंडे 


संबंधित लेख

लोकप्रिय