पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रमाणे प्रतिष्ठान च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
ह्या प्रसंगी सेवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा.हरिनारायण शेळके, वाणी सर, प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष राजू गुणवंत, कार्याध्यक्ष दिपक पाटील, जितेंद्र छाबडा, सुनील कदम, तसेच सारिका रिकामे, शोभा नलगे काकू इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व भाविक भक्तांना दिनदर्शिका प्रसाद देते वेळी वाटण्यात आली. राजाराम सावंत यांनी सूत्रसंचालन केले.