खराडी : खराडी येथील पुणे महानरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार अनेक वर्षांपासून मंजूरी प्राप्त एक्झिबिशन ग्राउंडवर चालू असलेल्या अनधिकृत बांधकाम हालचालींच्या विरोधात सुरेंद्र बापूसाहेब पठारे यांनी नागरिकांसमवेत शनिवारी (७ जुलै) जाहीर निषेध व्यक्त केला.
शहरीकरणाच्या नावाखाली हल्ली पुणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये बेकायदेशीरपणे मोकळ्या मैदानांवर बांधकाम सुरू झालेले पाहायला मिळते. मैदानांवर होणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. खराडी येथील एक्झिबिशन ग्राउंडवर सातत्याने अनधिकृत बांधकाम हालचाली निदर्शनास येत असल्याची माहिती स्थानिक रहिवासी नागरिकांनी दिली. या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात सुरेंद्र पठारे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी शुक्रवारी एक्झिबिशन ग्राउंडवर निषेध मोर्चा काढला होता.

या संबंधी बोलताना सुरेंद्र पठारे म्हणाले, की “एक्झिबिशन ग्राउंडवर चालू असलेली अनधिकृत बांधकाम हालचाल आम्हाला मान्य नाही. पुणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार हे मैदान एक्झिबिशन ग्राउंडसाठी आरक्षित केलेले आहे. तरीही, पालिका नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी या मैदानाचा विकास न करता खाजगी बांधकाम व्यावसायिकांच्या घशात हे आरक्षित मैदान घालत आहे. महानगरपालिकेने ज्या गोष्टीसाठी हे मैदान आरक्षित केले आहे; त्या संबंधीत गोष्टींसाठीच या मैदानावर विकास व्हावा. आम्हाला या मैदानावर कॉंक्रीटचे जंगल झालेले चालणार नाही आणि म्हणून आम्ही सर्व नागरिक मिळून हा निषेध व्यक्त करत आहोत.”
त्यावेळी, एक्झिबिशन ग्राउंडवरील अनधिकृत बांधकामाच्या संबंधी पालिका प्रशासन यंत्रणेने लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.
हे ही वाचा :
धक्कादायक : मंत्र्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना तब्बल दोन तास रस्त्यावर केले उभे
‘हा आपल्या दोघांतील मुलभूत फरक’ खा. कोल्हेंचे आढळराव पाटील यांना प्रत्यूत्तर
ब्रेकिंग : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ठाकरे गटाच्या बड्या महिला नेत्या शिंदे गटात
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार?
ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात
ब्रेकिंग : 9 आमदार आणि 3 खासदार निलंबित; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोडी