Sunday, May 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडप्रा. तेजस्विनी शिंदे व डॉ. सागर गोरड यांना परमपूज्य यशवंतराव माने (बाबा)...

प्रा. तेजस्विनी शिंदे व डॉ. सागर गोरड यांना परमपूज्य यशवंतराव माने (बाबा) महाराज युवा विद्यार्थी पुरस्कार प्रदान

सातारा : संत गाडगे महाराज आश्रम शाळा माजी विद्यार्थी फौंडेशनच्या वतीने दिला जाणारा परमपूज्य यशवंतराव माने (बाबा) महाराज युवा विद्यार्थी पुरस्काथ प्रा. तेजस्विनी शिंदे – रणपिसे व डॉ. सागर गोरड यांना संत गाडगे महाराज आश्रम शाळा माजी विद्यार्थी फौंडेशन, श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई चे संचालक बाळासाहेब माने व आजी माजी शिक्षक यांच्या हस्ते गोंदवले येथे गौरवचिन्ह, सन्मानपत्र व रक्कम देऊन प्रदान करण्यात आला.

आश्रम शाळेतील मुले महाराष्ट्रातून अनेक ठिकानाहून आज बाबांना अभिवादन करण्यासाठी गोंदवले या सृजनशील भूमीमध्ये आले होते. विद्यार्थी जीवनामध्ये महामानवाचे विचार पेरणे व विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध बनवणे हे माझे परम कर्तव्य आहे असे मत पुरस्कार्थी तेजस्विनी शिंदे – रणपिसे यांनी व्यक्त केले.

विद्यार्थी यांचे शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी फौंडेशन नेहमी अग्रेसर राहील व समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत आपली परिवर्तन चळवळ घेऊन जाऊ असे विचार पुरस्कार्थी सागर गोरड सर मांडले.

शाळेतील माजी विद्यार्थी यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांसाठी एक मंच तयार केला, व त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांना मदत उभा केली. मला या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो. असे मत बाळासाहेब माने यांनी व्यक्त केले.

आश्रम शाळेतील माजी विद्यार्थी हे एक कुटुंब आहे त्याला परिपूर्ण करण्यासाठी व त्यांचे जीवन समृद्ध, दुःखमुक्त करण्यासाठी ह्या फाऊंडेशनची निर्मिती केली आहे, हा वटवृक्ष असाच बहरत राहो. असे विचार फौंडेशन चे कार्याध्यक्ष अ‍ॅड.धम्मसागर भारती यांनी व्यक्त केले.

अक्षय भोसले महाराज म्हणाले कि संत गाडगे महाराज यांचे शिष्य परमपूज्य यशवंत माने बाबा यांचे विचारांचे प्रत्यक्षात आचरण करून कृतिकार्यक्रमाद्वारे माजी विद्यार्थी फौंडेशन बाबांचे कार्य पुढे घेऊन निघाली आहे. हेच खरे अभिवादन बाबांना आहे. या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर, आजी माजी शिक्षक, पुरस्कार संयोजन समिती, फाउंडेशनचे सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व जनसमुदाय उपस्थित होता.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय