पिंपरी चिंचवड : मधुकर बच्चे युवा मंच वतीने केशवनगर चिंचवड येथे शिवजयंती निमित्त शिवाजी महाराज निबंध स्पर्धा आयोजित केल्या होत्या, त्याचा बक्षीस समारंभ केशवनगर चिंचवड येथे अयोजित केला होता.
प्रभागातील २१५ स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. अनेक स्पर्धकांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रथम क्रमांक शिवानी फणसे द्वितीय क्रमांक चिन्मयी व्यवहारे, त्रितिय क्रमांक आदिती मुळीक, यांनी बक्षिसे पटकावली. सर्व सहभागी स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस व प्रशस्तीपत्र देण्यात आली.
महावितरण आभियंता शीतल मेश्राम या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. आयोजक महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे यांनी प्रास्थाविक करून उपस्थित सर्व मान्यवर व स्पर्धक तसेच नागरिकांचे स्वागत केले.
नगरसेवक मोरेश्वर शेडगे, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, विठ्ठल भोईर, रवींद्र देशपांडे, विठ्ठल सायकर, श्रीराम परबत, राहुल भोईर, पोपट पवार, भाजपा महिला अध्यक्षा उज्वला गावडे, नगरसेविका जयश्री गावडे शोभा भराडे, अपर्णा मणेरीकर, प्रा .माधुरी गुरव, संजीवनी पांडे, सिमरन मौलवी, सरिता डोंगरे, निकिता चिंचवडे, पल्लवी पाठक, ऍड.अभिलाषा गोलांडे, प्राजक्ता पत्की, कविता खिंवसरा, रेखा जाजू, आदी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.
रोहिणी बच्चे, सोनाली कुलकर्णी, अर्चना बच्चे, श्रद्धा शिंदे, श्रावणी बच्चे, तन्वी कुलकर्णी, आसावरी बच्चे, सई कुलकर्णी आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यास पुढाकार घेतला. अल्पना गोडबोले यांनी सूत्र संचालन केले.
भाजपा भटके विमुक्त पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौरभ शिंदे, गणेश बच्चे, राजू कोरे, किरण वाल्हेकर, पोपट बच्चे, राजेंद्र चौधरी, मुकुंद गुरव आदींनी कार्यक्रमास पुढाकार घेतला. प्रभागातील महिला व नागरिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थीत होते. महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
– क्रांतिकुमार कडुलकर