Narendra Modi : पुणे, बारामती, शिरुर व मावळ या चारही लोकसभा निवडणूक मतदारसंघातील (Pune) महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि. 29) पुणे दौऱ्यावर आहेत. आज सायंकाळी लष्कर भागातील रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची जाहीर सभा होणार आहे.
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, मनसे, आरपीआय यांच्याबरोबर सर्व सहकारी पक्ष सभेच्या तयारीला लागले आहेत. २१ विधानसभा मतदारसंघामधून सभेसाठी कार्यकर्ते येणार आहेत. या सभेसाठी आठ ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. दुचाकी, चारचाकी वाहने, बस यांच्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे व शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली.
मोदींच्या दौऱ्यानिमित्त शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येत असून पुढील दोन दिवस ड्रोन, हलकी विमाने (लाइट एअर क्राफ्ट) वापरण्यास सक्त मनाई करण्यात येत असल्याचे आदेश पुणे सहपोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी दिले आहेत.
पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्ताचे आदेश दिले आहेत. रेसकोर्स मैदान आणि शिवाजीनगर येथे हॅलीपेड तयार करण्यात आले त्यामुळे रविवारी मध्यरात्रीपासून पुढील दोन दिवस ड्रोन वापरण्यास मनाई आहे. पोलिसांव्यतिरिक्त इतर कोणत्याही संस्थांना ड्रोन कॅमेरा वापरण्यात येणार नाही. जर ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करायचा असेल तर विशेष शाखेच्या पोलिस आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक असेल. विनापरवानगी कॅमेऱ्याचा वापर केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त प्रविण पवार यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा :
धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवत आत्महत्या
स्वतःसाठी खोके घेऊन गप्प बसणाऱ्यांना घरी बसवा – खासदार प्रियंका चतुर्वेदी
ब्रेकिंग: अभिनेता साहिल खान पोलिसांच्या ताब्यात, वाचा काय आहे प्रकरण !
ब्रेकिंग : शरद पवारांना मोठा धक्का ; उमेदवारावरच गुन्हा दाखल, अटकेची टांगती तलवार
मोठी बातमी : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम लोकसभेच्या मैदानात, ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर
मोठी बातमी : भांडूपमध्ये पैशाने भरलेली गाडी पोलिसांच्या हाती, राज्यभरात खळबळ
ब्रेकिंग : राज्यात आणखी एका बँकेला ९ कोटींचा गंडा, भाजप पदाधिकाऱ्यांना अटक
मोठी बातमी : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अभिनेता बेपत्ता