जुन्नर / शिवाजी लोखंडे : शिरूर लोकसभेचे खासदार जुन्नर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी नाणेघाट येथील ब्रिटिश कालीन फडके बंधारा येथे भेट दिली. यावेळी आजी माजी सरपंच संघटनेच्या वतीने पर्यटन विकासासंदर्भात निवेदन पत्र देण्यात आले.
यामध्ये किल्ले जीवधनला दोन्ही बाजूंनी पायरी मार्ग करण्यात यावा. वन विभागाकडून पर्यटकांना निवासी व्यवस्था करण्यात यावी. ब्रिटीश कालीन बंधाऱ्यात बोटिंग सुविधा करण्यात यावी. तसेच नाणेघाट येथे झुलता पुल तसेच पॅगोड तसेच नाणेघाट विविध सुविधांची मागणी या निमित्ताने संघटनेच्या वतीने खासदार अमोल कोल्हे यांच्या कडे करण्यात आली.
त्यावेळी आजी माजी सरपंच संघटनेचे अध्यक्ष पोपट रावते, राष्ट्रवादी काँगेस सरचिटणीस अमोल लांडे, ज्येष्ठ नेते दादाभाऊ बागड, सीताराम खिल्लारी, देवराम नांगरे, विक्रम मुंढे, ललित जोशी, सोमा लांडे, किसन अंभिरे, आदिवासी अधिकार मंचाचे विकास रावते, नाभिक संघटनेचे सचिन डाके, दुंदा शिंगाडे, पिलाजी शिंगाडे, सुरेश रावते, चिंधा घोयरत, बाळू घोयरत, बिरसा ब्रिगेडचे अशोक मुकणे, संजय शिंदे, सुभाष डाके, बाळू असवले, वामन मुकणे, सुनिल साबळे, अनंता रावते ग्रामस्थ सह मान्यवर उपस्थित होते.