Prakash Ambedkar : राज्यात लोकसभा निवडणूकांचे वातावरण चांगलेच तापले आहे. आरोप प्रत्यारोप देखील जोरदार सुरू आहे. अशात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी एक खळबळजणक दावा केला आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे दिसणार नाहीत असं वक्तव्य एका सभेत केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तूळात जोरदार चर्चा रंगली आहे.
हिंगोलीमधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. बि.डी. चव्हाण यांची प्रचार सभा पार पडली. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यावर जोरदार टीका केली. दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे दिसणार नाहीत. निवडणूक संपल्यानंतर जस कामं संपतं तसं एकनाथ शिंदे दिसणार नाहीत असा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे.
याशिवाय प्रकाश आंबेडकर त्यांच्या भाषणात म्हणाले की 17 लाख कुटुंबांनी देश सोडला आहे. हे लोक मुस्लिम किंवा ख्रिश्चन नाहीत तर हिंदूच आहेत. त्यांची मालमत्ता 50 कोटी आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विचारतो असा प्रश्न विचारतो आहे की, तुम्ही कोणत्या तोंडाने मोदींना मतं द्यायला सांगत आहात? तुम्हाला लाज कशी वाटत नाही? असा रोखठोक हल्लाबोल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.


हे ही वाचा :
ब्रेकिंग : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर, वाचा किती दिवस असणार सुट्ट्या !
अजितदादांच्या राष्ट्रवादीला चारच जागा मिळतात ही शोकांतिका डॉ. अमोल कोल्हेंचा टोला
मोठी बातमी : पुण्यातील तिरंगी लढतीत आता पंतप्रधान मोदींची होणार जाहीर सभा
अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल
निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित
अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण
कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे
युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी
दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष
ब्रेकिंग : काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसच्या महासचिवाचा वंचितमध्ये प्रवेश