मुझफ्फराबाद : पाकिस्तान व्याप्त (POK) काश्मीर मध्ये वातावरण बिघडत चालले आहे. येथील हजारो नागरिक पाकिस्तानातून स्वतंत्र होण्यासाठी गेले चार दिवस आंदोलन करत आहेत, Pok मध्ये हिंसक झालेल्या पाकीस्तान सरकार विरोधी प्रदर्शनाचा आज चौथा दिवस आहे. Pok मधून हिंसेचे अनेक व्हिडीओ समोर आले आहे.
शुक्रवारपासून पाक व्याप्त काश्मीरमध्ये सरकारने अन्नधान्य आणि विजेच्या किमती वाढवल्या आहेत, यामुळे नागरिक संतप्त झाले असून पाकिस्तान सरकार विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. रविवारी या आंदोलनात पोलीस आणि नागरिक यांच्यात मोठा हिंसाचार झाला. आंदोलकांनी पोलिसांना बेदम मारहाण केली.
या आंदोलनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, संतप्त नागरिक है हक्क हमारा आझादी (freedom) अशा घोषणा देत स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. मुझफ्फराबाद, सामहनी, सेहंसा, मीरपूर, रावळकोट, खुईरट्टा, तट्टापानी आणि रावळकोट आदी प्रमुख शहरात पाक व्याप्त काश्मीर मध्ये (POK) पाकिस्तानी सुरक्षा दले आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमकी सुरू आहेत.
प्रशासनाने पाकिस्तान रेंजर्स आणि फ्रंटियर कॉर्प्सच्या जवानांसह अतिरिक्त सैन्य तैनात केले आहे. पाकिस्तानी सैन्याने लहान मुलांनाही सोडले नाही. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, ज्या शाळेच्या आत पडल्या. अनेक मुले जखमी झाल्याचे वृत्त आहे. pok protest news


हेही वाचा :
Tourism : उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जा, दक्षिण भारतात
POK : हैं हक्क हमारा आझादी, पाकव्याप्त काश्मिरी जनता रस्त्यावर
मोठी बातमी : मुंबईत वादळी पावसाने होर्डिंग कोसळून ३ ठार, १०० अडकले
Rain : मुंबई, ठाणे येथे मुसळधार सुरू
बाकी कंपन्यांचे उडाले होश, ‘ही’ कंपनी देशात आणतेय जगातील पहिली CNG बाईक
अफगाणिस्तानात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात ३०० हून अधिक मृत्यू, हजारो विस्थापित
Condom : अबब अजबच ! तरुणाईला लागले फ्लेव्हर्ड कंडोमचं पाणी पिण्याचे व्यसन ?