Friday, December 27, 2024
HomeNewsकविता - माय मराठिचे गुणगाण - दिपाली मारोटकर

कविता – माय मराठिचे गुणगाण – दिपाली मारोटकर

माय मराठीचे सदैव, करा रे गुणगाण

मातृभाषा आमुची ही, अमुचाहे बहुमान !!धृ!!

शिवबाच्या महाराष्ट्राची, ही मराठमोळी

सर्वांशी मैत्री जोडी, आहे साधीभोळी

ओठावरी ठेवूनिया, वाढवा तिची रे शान !!१!!

माय मराठीचे…..

जुन्या परंपरेने, अमुच्या ओठी आली

तिच्या अस्तित्वाने आम्ही, प्रगती ही केली

प्रत्येकालाच असावा, मराठीचा अभिमान !!२!!

माय मराठीचे…..

परकीय भाषांचाही, ती हात हाती घेते

मैत्रीपूर्ण संबंधाने, दुजा हाक ही देते

महाराष्ट्र मायेची, असो सर्वांनाच जाण !!३!!

माय मराठीचे…..

कित्येक भाषांची तिने, झेलली आक्रमणे

तोंड दिले सर्वांना, तिनेच समर्थपणे

तिजला मिळावा दर्जा, अभिजात सन्मान !!४!!

माय मराठीचे….

दिपाली मारोटकर

रा.पळसखेड, ता.चांदुर, अमरावती

संबंधित लेख

लोकप्रिय