जुन्नर (पुणे) : प्राथमिक आरोग्य केंद्र आपटाळे अंतर्गत अलदरे येथे कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहीम संपन्न झाली. वय 45 वर्षापुढील 132 लोकांनी लसीकरणाचा लाभ घेत प्रतिसाद दिला.
या कोरोना लसीकरण मोहिमेत वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप गोसावी, डॉ.हेमलता शेखरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक राजेश शेरकर, अनंत बरवे, सौ.नवले, युवा नेते दिपक सरजिने, आशा वर्कर तेजस्वीनी सरजिने व शिक्षक वर्ग ह्यांच्या विशेष सहकार्यातून पार पडले.
यावेळी अलदरे गावच्या सरपंच सविताताई सरजिने, ग्रामसेवक आल्हाट भाऊसाहेब, माजी सरपंच निलेश सरजिने, तसेच उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील, सोसायटी चेअरमन, संचालक विविध संस्था/ट्रस्ट चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, आजी माजी सर्वच जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व अलदरे ग्रामस्थ उपस्थित होते.