PM Internship scheme : भारत सरकारने तरुणांसाठी इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. पीएम इंटर्नशिप योजना (PM Internship scheme) असं या योजनेचं नाव आहे. युवकांना प्रत्येक महिन्याला 5000 रुपये मिळणार आहेत. हा सरकारचा एक पायलट प्रोजेक्ट आहे.
3 ऑक्टोबरला ही योजना सुरु करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती.
पीएम इंटर्नशिप योजना आहे तरी काय?
पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत 5 वर्षांत देशातील सुमारे 1 कोटी तरुणांना कंपन्यांमध्ये इंटर्नशिप दिली जाणार आहे. या योजनेत इंटर्नला दरमहा 5,000 रुपये दिले जातील. त्यापैकी 4500 रुपये भारत सरकार आणि 500 रुपये इंटर्नशिप देणारी कंपनी देईल. या योजनेअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांची यादी 26 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करता येणार आहे. 27 नोव्हेंबरपर्यंत कंपन्या अंतिम निवड करतील आणि 2 डिसेंबर 2024 पासून 12 महिन्यांसाठी इंटर्नशिप सुरू होईल.
टॉप 500 कंपन्या देणार इंटर्नशिप!
पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत तरुणांना भारतातील टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळेल. पाच वर्षांच्या कालावधीत 1 कोटी तरुणांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. सुरुवातीला इंटर्नशिपमध्ये सहभागी होण्यासाठी 6,000 रुपये एकरकमी आर्थिक सहाय्य दिले जाईल. त्यानंतर एक वर्षासाठी प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल. इंटर्नशिप 12 महिन्यांसाठी असेल. चालू आर्थिक वर्षात 1.25 लाख इंटर्नशिप संधी उपलब्ध करून देण्याची योजना असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी सांगितली आहे. यासाठी 800 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
नोंदणी कधी सुरू होणार ?
10 ऑक्टोबरपर्यंत कंपन्या त्यांच्या गरजा आणि इंटर्नशिप पोस्ट्सची माहिती देतील. इच्छुक तरुण 12 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून www.pminternship.mca.gov.in या पोर्टलवर नोंदणी करु शकतील. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी 26 ऑक्टोबरपर्यंत कंपन्यांना दिली जाईल. हे पोर्टल प्रायोगिक तत्त्वावर नुकतेच सुरु करण्यात आले असले तरी, इंटर्नच्या अर्जासाठी पोर्टल उघडण्यासाठी सरकारने विजयादशमीचा शुभ दिवस निवडला आहे.
इंटर्नशिपसाठी पात्रता काय?
पीएम इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 21 ते 24 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. सध्या औपचारिक पदवी अभ्यासक्रम किंवा नोकरी करणाऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही. तथापि, असे उमेदवार ऑनलाइन अभ्यासक्रम किंवा व्यावसायिक प्रशिक्षणाचा भाग बनू शकतात.
PM Internship scheme


हेही वाचा :
लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे ‘या’ दिवशी जमा होणार
Viral video : गोव्यात बोट पलटी, 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मधील सत्य काय?
बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक अत्याचार
मोदी मुंबईत, तर राहुल गांधींची तोफ कोल्हापुरात धडाडणार
आदिवासी आमदारांचे मंत्रालयात आंदोलन, मंत्रालयाच्या जाळीवर मारल्या उड्या
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय
स्टेट बँकेची बनावट शाखा उघडून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार
महाराष्ट्रातील या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस होणार बंद, ही आहेत कारणे
धक्कादायक : झारखंडमध्ये बॉम्बस्फोटाने उडवला रेल्वे ट्रॅक
आमदार अतुल बेनके यांच्या समर्थकांनी घेतली शरद पवारांची भेट, पवारांकडे केली ‘ही’ मागणी
दिवाळीपूर्वीच महागाईचा झटका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर
नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल
अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात उपचार सुरू
मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम