Thursday, May 2, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडयोगिता नागरगोजे यांच्या वाढदिवसानिमित्त देशी वृक्षारोपण

योगिता नागरगोजे यांच्या वाढदिवसानिमित्त देशी वृक्षारोपण

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : भरारी युवा मंचच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. कृष्णानगर प्रभागात छत्रपती शिवाजी पार्क येथे वेगवेगळ्या प्रकारचे देशी वृक्ष लागवड करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमात माजी नगरसेवक केशव घोळवे, प्रभाग अधिकारी सिताराम बहुरे सामाजिक कार्यकर्ते शिवानंद चौगुले व माजी नगरसेविका योगिता नागरगोजे यांचे सहकारी यांनी मनोगत व्यक्त केले. सध्याच्या जागतिक प्रदूषणावरती नियंत्रण मिळवण्यासाठी वृक्ष लागवड एकमेव उपाय असून ते सर्वत्र अधिक प्रमाणात राबविले पाहिजे असे मान्यवरांनी सांगितले.



प्रत्यक्ष भेटीपेक्षा आपापल्या परिसरातील पीडित, वंचितांना थेट मदत करून विविध उपक्रमाद्वारे वाढदिवस साजरा करा असे आवाहन केले होते. त्यामुळे संपूर्ण प्रभागात हा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. कृष्णानगर प्रभागात सुद्धा वृक्ष लागवड करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. सामाजिक आणि राजकीय तथा शैक्षणिक क्षेत्रात आपल्या दैदिप्यमान कामगिरीने प्रभावित असलेले कार्यक्षम नगरसेविका म्हणून ज्यांची गणना केली जाते. नगरसेविका योगिता ज्ञानेश्वर नागरगोजे यांनी राजकारण करत समाजसेवा हा त्यांचा मूळ हेतू त्यांनी तडीस नेला आहे. अत्यंत मितभासी, प्रचंड जनसंपर्क, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणाऱ्या व तत्पर सेवा देणारी कार्यक्षम नगरसेविका म्हणून एक आदर्श निर्माण केला आहे.



समाजाचे ऋण कसे फेडायचे तर आपण केलेले कोणतेही काम हे समाजाच्या हिताचे फायद्याचे असावे असाच मानस योगिता नागरगोजे यांचा असतो त्याच धर्तीवर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या माजी मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा आदर्श त्यांनी अंगीकारला आहे. वृक्षांची लागवड करून ते वृक्ष जोपासण्याचा निर्धार योगिता नागरगोजे, केशव घोळवे व सामाजिक कार्येकर्ते यांनी प्रत्यक्षात वृक्षारोपण करीत केले. यांनी कोणतीही बॅनरबाजी , ढोंगदारी न करता समाजाच्या हितासाठी लोकनेत्या पंकजा ज्या पद्धतीने काम करतात त्याच पद्धतीने अनाठायी खर्च न करता वृक्ष लागवड करून सामाजिक उत्तरदायित्व निभावण्याचे काम नागरगोजे परिवाराकडून होत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय